पुणे, 2 नोव्हेंबर 2023- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पीवायसी हिंदु जिमखाना व डीव्हीसीए या संघांनी अनुक्रमे आर्यन्स क्रिकेट क्लब व पूना क्लब संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना मैदानावरील लढतीत रोहन दामले(83 धावा व 3-43) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आर्यन्स क्रिकेट क्लबचा 97 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 50 षटकात 9 बाद 316 धावा केल्या. यात अद्वैय शिधयेने 55चेंडूत 7चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 61 धावा काढून सुरुवात करून दिली. त्यानंतर रोहन दामलेने 65चेंडूत 7चौकार व 4 षटकाराच्या मदतीने 83धावा केल्या. त्याला दिव्यांग हिंगणेकरने 71 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या साहाय्याने 47 धावा काढून साथ दिली. या जोडीने १०१ चेंडूत १०३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्वप्नील फुलपगारने 50 धावा काढून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली. आर्यन्सकडून अक्षय काळोखे(4-71), कौशल तांबे(2-53) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट क्लबचा डाव 41.3 षटकात सर्वबाद 219धावांवर संपुष्टात आला. यात शुभम तैसवाल नाबाद 82, हरी सावंत 59, अजित गव्हाणे 21 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीवायसीकडून रोहित जना(4-54), रोहन दामले(3-43), दिव्यांग हिंगणेकर(2-37) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला 97 धावांनी विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात टिळक जाधव(5-32)याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह पवन शहाच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. (Final match between PYC Hindu Gymkhana and DVCA in Doshi Engineers Trophy Interclub Senior Cricket Tournament)
निकाल: उपांत्य फेरी:
डेक्कन जिमखाना मैदान:
पीवायसी हिंदू जिमखाना: 50 षटकात 9 बाद 316 धावा(रोहन दामले 83(65,7×4,4×6), स्वप्नील फुलपगार 50(44,5×4,1×6), दिव्यांग हिंगणेकर 47(71,2×4,1×6), अद्वैय शिधये 61(55,7×4,3×6), अक्षय काळोखे 4-71, कौशल तांबे 2-53)वि.वि.आर्यन्स क्रिकेट क्लब: 41.3 षटकात सर्वबाद 219 (शुभम तैसवाल नाबाद 82(61,11×4,3×6), हरी सावंत 59(46,5×4,4×6), अजित गव्हाणे 21, रोहित जाना 4-54, रोहन दामले 3-43, दिव्यांग हिंगणेकर 2-37); सामनावीर – रोहन दामले; पीवायसी संघ 97 धावांनी विजयी;
पूना क्लब मैदान:
पूना क्लबः 40 षटकात सर्वबाद 197धावा(ऋषभ राठोड 47(54,5×4,2×6), सागर बिरदवडे 42(57,5×4,1×6), यश नाहर 18, अकिब शेख 16, टिळक जाधव 5-32, ओंकार राजपूत 2-38, पवन शहा 2-42) पराभुत वि.डीव्हीसीए: 36.1 षटकात 3बाद 199धावा(पवन शहा नाबाद 92(117,11×4,1×6), सौरभ नवले नाबाद 54( 40,7×4,1×6), ओम भोसले 19, विनय पाटील 15, धनराज परदेशी 1-24, शुभम कोठारी 1-29); सामनावीर -पवन शहा; डीव्हीसीए संघ 7 गडी राखून विजयी.