पुणे। केसरी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या तिसर्या दिवशी झालेल्या सामन्यात फिनायक्यु, स्निगमय एफ.सी, संगम यंग बॉइज अ आणि इंद्रायणी संघांनी विजयी कामगिरी साकारली.
तिसर्या दिवशीचा पहिला सामना फिनायक्यु फुटबॉल संघ विरुद्ध शिवाजीयन्स ब फुटबॉल संघात एकतर्फी झाला. या सामन्यात फिनायक्यु संघाच्या प्रकाश थोरात याने शानदार कामगिरी करत हॅट्रीक केली. प्रकाश थोरात याने 25 मिनीट, 48 आणि 60 मिनीटाला निर्णायक गोल केले. प्रकाश थोरातच्या तीन गोलांवर फिनाक्यु फुटबॉल संघाने हा सामना 3-1 असा जिंकला.
फिनायक्यु फुटबॉल संघाचा फुटबॉलपटू परेश शिवलकरच्या सर्वोत्तम पासवर प्रकाश थोरातला हे तीन गोल उत्तमरित्या करता आले. प्रकाश शिवलकर हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. त्याचे पास देण्याच्या कामगिरीची चुणुक केसरी करंडकात दिसून आली. तर फिनायक्यु फुटबॉल संघाचा गोलकिपर कमलेश सावंत याने सर्वोत्तम गोलरक्षण करत विरुद्ध शिवाजीयन्स ब फुटबॉल संघाचे गोल अडवले. शिवाजीयन्स ब फुटबॉल संघाच्या दारिश लिमा याने 42 मिनीटाला शिवाजीयन्स ब फुटबॉल संघासाठी एकमेव गोल केला. तर शिवाजीयन्स ब फुटबॉल संघाचे सर्वेश देशपांडे, सागर पटेल हे चांगले फुटबॉलपटू अपयशी ठरले.
तिसर्या दिवशीचा दुसरा सामना स्निगमय एफ.सी विरुद्ध सांगवी एफ सी संघात अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात स्निगमय एफ.सी संघाच्या मुझफ्फर शेख याने सामन्याच्या 10 व्या मिनीटाला पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच स्निगमय एफ.सी संघाच्या सुमित भंडारी याने 18 व्या आणि 26 व्या मिनीटाला दुसरा आणि तिसरा गोल केला. तर त्यानंतर लगेचच मुझफ्फर शेख याने 46 मिनीटाला चौथा गोल तर सुमित भंडारी याने 58 मिनीटाला पाचवा गोल केला. स्निगमय एफ.सी संघाचा गोलकिपर हरविंदर बुमराह याने सर्वोत्तम गोलरक्षण केले.
सांगवी एफ सी संघाच्या शुभम सावंत याने 42 मिनीटाला पहिला गोल करत चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याला शॉन आर्यंलंड याने 52 मिनीटाला आणि स्मितेश भट याने 47 मिनीटाला गोल करत चांगली साथ दिली. मात्र सांगवी एफ सी संघाच्या फुटबॉलपटूंना फक्त 3 गोल करता आले. त्यामुळे हा सामना स्निगमय एफ.सी संघाने अत्यंत चुरशीने 5-3 असा जिंकला.
त्यानंतर तिसरा सामना संगम यंग बॉइज अ संघ आणि सेंट्रल रेल्वे संघात झाला. हा सामना एकतर्फी झाला. संगम यंग बॉइज अ संघाच्या शाहरुख शेख याने पहिल्या 5 मिनीटाला 1 ला गोल केला. त्यानंतर लगेचच संगम यंग बॉइज अ संघाच्या आशिष पांडे याने 18 मिनीटाला दुसरा गोल तर शाहरुख शेख याने 20 मिनीटाला तिसरा गोल केला. तर संगम यंग बॉइज अ संघाच्या आकाश किरवे याने 30 मिनीटाला आणि अविनाश सावंत याने 58 मिनीटाला असे तब्बल 5 सुरेख गोल करत हा सामना 5-0 असा एकतर्फी जिंकला.संगम यंग बॉइज अ संघाचा गोलकिपर ललीत पाटील याने सर्वोत्तम गोलरक्षण करत विरुद्ध संघाला एकही गोल करू दिला नाही. सेंट्रल रेल्वे संघाचे अमर परदेशी आणि अक्षय जावडे, निखील राठोड हे फुटबॉलपटू अपयशी ठरले.
चौथा सामना इंद्रायणी आणि म्यॅथ्यु फुटबॉल अकादमी संघात रंगला. हा सामना अगदी अटीतटीचा झाला. या सामन्यात इंद्रायणी संघाचा शुभम गायकवाड याने 9 मिनीटाला आणि 29 मिनीटाला सर्वोत्तम गोल केले. तर त्यानंतर इंद्रायणी संघाचा करमेंद्र सरोज याने 42 मिनीटाला तिसरा गोल केला. तर म्यॅथ्यु फुटबॉल अकादमी संघाच्या अॅस्टन म्यॅथ्यु याला 1 गोल करता आला. त्यानंतर सामन्यावर पकड मिळविण्यासाठी अॅस्टन म्यॅथ्यु आणि सोमेश गायकवाड यांनी दांडगाईचा खेळ केल्यामुळे त्यांना रेड कार्ड दाखविण्यात आले. तसेच सामना संपण्याआधी त्यांना मैदानाबाहेर काढले. त्यामुळे हा सामना इंद्रायणी संघाने 3-1 असा जिंकला.
केसरी करंडकाचा संक्षिप्त निकाल
दिवस तिसरा
सामना 1 ) फिनायक्यु फुटबॉल संघ विरुद्ध शिवाजीयन्स ब फुटबॉल संघ
निकाल : फिनाक्यु फुटबॉल संघाने हा सामना 3-1 असा जिंकला.
सामना 2) स्निगमय एफ.सी विरुद्ध सांगवी एफ सी फुटबॉल संघ
निकाल : स्निगमय एफ.सी संघाने अत्यंत चुरशीने 5-3 असा जिंकला.
सामना 3) संगम यंग बॉइज अ संघ विरुद्ध सेंट्रल रेल्वे संघ
निकाल : संगम यंग बॉइज अ संघाने 5-0 असा एकतर्फी जिंकला.
सामना 4) इंद्रायणी विरुद्ध म्यॅथ्यु फुटबॉल अकादमी संघ
निकाल : इंद्रायणी संघाने 3-1 असा जिंकला.
आजचे आयोजित सामन्यांचे वेळापत्रक
1) रुपाली स्पोर्टस क्लब विरुद्ध ब्लु स्टॅग : सकाळी 9 वाजता
2) व्होबा बी विरुद्ध नवमहाराष्ट्र : सकाळी 10.30 वाजता
3) यु. के. एम. ब संघ विरुद्ध शिवाजीयन्स संघ : दुपारी 1.00 वाजता
4) आयफा स्काय व्हॉक्स विरुद्ध डेक्कन 11 क संघ : दुपारी 2.30 वाजता