---Advertisement---

…म्हणून ऍरॉन फिंचने मानले धोनी आणि कोहलीचे आभार

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी यांनी आपली जर्सी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचला भेट म्हणून दिली आहे. याबद्दल फिंचने खुलासा करत धोनी आणि कोहली या दोघांचेही आभार मानले आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान धोनी आणि कोहलीने फिंचला या जर्सी भेट दिल्या आहेत. फिंचने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

त्याने इंस्टाग्रामवर धोनी आणि कोहलीची जर्सी हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे. तसेच या पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘धोनी आणि कोहली धन्यवाद. आम्ही भारताविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या मालिकेदरम्यान तूम्ही दोघांनी शर्ट भेट दिल्याने मी भाग्यशाली आहे. आपण मैदानावर आपल्या देशासाठी झुंज देतो. पण मी तूमच्या दोघांचा सन्मान करतो. तूम्ही सर्वकालिन दिग्गज आहात. मी तूमचा आभारी आहे की आम्हाला तूम्ही अशी संधी दिली.’

https://www.instagram.com/p/Bwys-x6FTcT/?utm_source=ig_twitter_share&igshid=rwhg6dfwkhqx

ऑस्ट्रेलियाने फेब्रुवारी-मार्चमध्ये केलेल्या भारत दौऱ्यात भारताविरुद्ध 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. यातील टी20 मालिकेत 2-0 ने तर वनडे मालिकेत 3-2 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

आता हे दोन संघ थेट 2019 विश्वचषकात 9 जूनला आमने-सामने येणार आहेत. या विश्वचषकातून मागील एक वर्षांच्या बंदीनंतर ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०१९: प्लेऑफचे सामने सुरु होणार या नवीन वेळेत

९ वेळा नाणेफक हरल्यानंतर विराटने असे केले सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला झाला मोठा दंड, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment