नागपूर | इराणी ट्राॅफीचा थरार आजपासून सुरू झाला. नागपूर येथील जामठावरील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या निर्णय योग्य ठरवत विदर्भाने शेष भारताविरूद्ध १ बाद १२६ अशी चांगली सुरूवात केली आहे.
विदर्भाला पहिली वाहीली रणजी ट्राॅफी विजय मिळवून देणारा कर्णधार फैज फजलच या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असून करुण नायरकडे शेष भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
विदर्भाने जेव्हा रणजी ट्राॅफीमध्ये १ जानेवारी रोजी विजय मिळवला त्या सामन्यात विजयी धाव घेतली होती ती वसीम जाफरने. त्यानंतर तो कोणताही सामना खेळला नाही. परंतू आज जेव्हा तो संजय रामास्वामी हा सलामीवीर बाद झाल्यावर मैदानात आला तेव्हा त्याने त्याच्या खेळीची सुरूवातच चौकार मारून केली.
अनेक रणजी सामने खेळलेल्या जाफरला कधीही रणजी ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात विजयी धाव घेता आली नव्हती. ती संधी त्याला जानेवारी महिन्यात मिळाली.
तर अतिशय संयमी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जाफरने आज सरळ चौकार खेचत पुन्हा एकदा ऐतिहासिक खेळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामूळे विदर्भाचा कर्णधार फैज फजलसह शेष भारताचा कर्णधार करुण नायरलाही हसू आले.