---Advertisement---

हे आहेत भारताकडून पहिली कसोटी, वनडे आणि टी२०मध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज

---Advertisement---

नागपूर। रविवारी (10 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात तिसरा आणि निर्णायक टी20 सामना(3rd T20I) पार पडला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने(Deepak Chahar) हॅट्रिकसह 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

त्याने बांगलादेश विरुद्ध 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला बाद केले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला बाद करत हॅट्रिक साजरी केली.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक(hat-trick) घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेण्याचा पराक्रम करता आला नव्हता.

भारताकडून कसोटी आणि वनडेमध्ये पहिली हॅट्रिक घेणारे गोलंदाज –

भारताकडून कसोटीमध्ये सर्वात पहिल्यांदा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने(Harbhajan Singh) हॅट्रिक घेतली होती त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 मध्ये कोलकताला झालेल्या कसोटीत हॅट्रिक घेतली होती.

त्याआधी 1987 च्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध नागपूरला खेळताना भारताकडून चेतन शर्मा(Chetan Sharma )यांनी पहिल्यांदा वनडे हॅट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे ही विश्वचषक इतिहासातीलही पहिलीच हॅट्रिक होती.

त्यानंतर आता भारताला दीपक चाहरच्या रुपात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज मिळाला आहे.

भारताकडून पहिली हॅट्रिक घेणारे गोलंदाज –

कसोटी – हरभजन सिंग (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001)

वनडे – चेतन शर्मा (विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, 1987)

आंतरराष्ट्रीय टी20 – दीपक चाहर (विरुद्ध बांगलादेश, नागपूर, 2019)

https://twitter.com/Maha_Sports/status/1193788666407088128

https://twitter.com/Maha_Sports/status/1193754008973803520

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---