इन्स्टिटयूट ऑफ योगा आणि योग संजीवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुंबई योग महोत्सवाचे आयोजन निसर्गरम्य “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी”, केशवसृष्टी, उत्तन, भाइंदर येथे आयोजित केलेले आहे. सदर योग महोत्सवामध्ये “योग” विषयाबरोबर आयुर्वेद, अध्यात्म, मंत्र, यज्ञ इ. विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ आपले अमुल्य विचार मांडणार आहेच तसेच योगा मधील विविध विषयांचे प्रात्यक्षिक शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकविले जाणार असुन त्याचा सराव उपस्थित साधकांकडून करून घेतला जाणार आहे.
मनुष्य हा समुहाने जगणारा प्राणि अशी आपली सर्वांची संकल्पना आहे परंतु बदलत्या जीवन पद्धतीमुळे, अनैसर्गिक काम करण्याच्या पद्धतीमुळे माणूस हा स्वतःचा सुद्धा नीट विचार करताना दिसत नाही. अति काम, प्रवास, खाण्या-पिण्याच्या विविध वेळा, जागरण, असुया, खऱ्या प्रेमाचा अभाव, आणि सतत वाढणाऱ्या अपेक्षा यामुळे तो खूप त्रस्त झाला आहे.
भारतीय रूढी, परंपरा, योग परंपरा, वेद उपनिषद ज्ञान इ. ची त्याला उपज आहे, परंतु त्यामध्ये असणारी क्लिष्टता त्याला भंडावून सोडते हे सत्य आहे, मनुष्याला आपले सर्व ज्ञान, त्याला समजेल अश्या स्वरुपात आणि आवाक्यात हवे आहे. हाच संदर्भ घेऊन हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
या योग महोत्सवामध्ये साध्वी आभा सरस्वती (परमार्थ निकेतन, हरिद्वार)या मंत्रयोग, आचार्य मुकुंद भोळे (प्राणायाम), पद्मश्री डॉ शरद हर्डीकर (सांधेदुखी आणि योग), माताजी हंसाजी जयदेव (योग शिक्षकाचे व्यक्तिविशेष), विद्यावाचस्पती रामचंद्र देखणे (ज्ञानेश्वरी), जेष्ठ संस्कृत पंडित वसंत गाडगीळ (योग आणि आयुर्वेद साठी संस्कृत चे महत्व), आचार्य काशिनाथ मेत्री (योगोपचार), हरिभाऊ क्षिरसागर, आशिष पांड्ये , सौ. कुंदा काणे (यज्ञ), आचार्य विदुला शेंडे, आचार्य श्रीकांत क्षिरसागर, झुबीन मुल्ला, राधाचारण चौधरी इ. मान्यवर यज्ञ, ताणतणाव, व्याधीनुरूप योगोपचार, योग शिक्षकाचे प्रविण्य, मंत्र, शवासन, प्राणायाम, ज्ञानेश्वरी, संस्कृत भाषा आणि योग व आयुर्वेद, मधुमेह आणि योगोपचार, शक्ति पात, संजीवन प्राणायाम, अध्यात्म आणि व्यवस्थापन इ विषय मांडणार आहेत.
सदर महोत्सव हा निवासी स्वरूपामध्ये आहे, त्यासाठी मर्यादित जागा असून नाममात्र रु. ३,५००/- शुल्क आहे. (यामध्ये दोन दिवस निवास व्यवस्था, नाश्ता, दोन वेळेस जेवण इ चा समावेश आहे) त्यासाठी ९०४९२९६५३९ येथे संपर्क साधावा आणि www.mumbaiyogafestival.com येथे BOOKING मध्ये प्रवेशिका उपलब्ध आहेत.