येत्या काही दिवसात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. २६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे, तर बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. यापूर्वी भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद विराट कोहली याच्याकडे होते. परंतु, बीसीसीआयने त्याला या पदावरून काढून रोहित शर्मा याला कर्णधारपद दिले आहे. या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य वाटले होते. दरम्यान वनडे संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला.
यापूर्वी देखील रोहित शर्माने भारतीय संघाच्या प्रभारी कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. परंतु, यावेळी तो पूर्णवेळ कर्णधार म्हणून माध्यमांसमोर आला.
याबाबत बोलताना तो म्हणाला की, “जेव्हाही तुम्ही भारतीय संघासाठी खेळता, त्यावेळी तुमच्यावर अतिरिक्त दबाव असतो. बाहेरचे लोक तुमच्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी बोलत असतात. पण माझ्या मते एक कर्णधार म्हणून नाही, तर क्रिकेटपटू म्हणून माझं लक्ष फक्त माझं काम करण्यावर आहे. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यावर नाही. मी यापूर्वी देखील म्हटलं आहे, या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. मी हा मेसेज संघाला देखील देत असतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “सर्व खेळाडूंना माहीत आहे की, मोठ्या स्पर्धांमध्ये काय करायचं आहे. जे आपल्या हातात आहे. तेच करायचं आहे. आम्ही जिंकण्याची वृत्ती घेऊन मैदानात उतरतो, ज्यासाठी आम्ही ओळखलो जातो. आम्हा सर्वांसाठी एक गोष्ट जाणून घेणे महत्वाची आहे की, आम्ही एकमेकांबद्दल काय विचार करतो. आम्हाला या खेळाडूंमध्ये एक घट्ट बाँडिंग तयार करायचं आहे. या सर्व गोष्टींमध्ये राहुल भाई (राहुल द्रविड) मदत करतात.”
🗣️🗣️ "The pressure will always be there. As a cricketer, it is important to focus on my job."
SPECIAL – @ImRo45's first interview after being named #TeamIndia’s white-ball captain coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. 📽️
Stay tuned for this feature ⌛ pic.twitter.com/CPB0ITOBrv
— BCCI (@BCCI) December 12, 2021
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. ३ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. वनडे मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ दिग्गजांना नाही उंचावता आली रणजी ट्रॉफी
“नाहीतर ५-० ने ऍशेस गेली समजा”; दिग्गज कर्णधाराचा इंग्लडला निर्वाणीचा इशारा
“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”