येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (india vs west indies) या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० ने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ या मालिकेत जोरदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यात काही मोठे विक्रम होताना पाहायला मिळणार आहेत.
भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळताच खास विक्रम आपल्या नावावर करणार आहे. हा भारतीय संघाचा १००० वा वनडे सामना असणार आजे. इतर कुठल्याही संघाला आतापर्यंत असा कारनामा करता आला नाहीये. या यादीत ९५८ सामने खेळून ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे सर्वाधिक वनडे सामन्यात (५८१) विजय मिळवण्याच्या विक्रम आहे. तर भारतीय संघ सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी (५१८ ) आहे.
तसेच रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार म्हणून १००० व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याचा खास विक्रम आपल्या नावावर करणार आहे. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु त्याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नव्हती. त्याच्या ऐवजी केएल राहुलने वनडे संघाचे नेतृत्व केले होते. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघाने पहिला वनडे सामना १३ जुलै १९७४ रोजी खेळला होता. त्यावेळी अजित वाडेकर भारतीय संघाचे कर्णधार होते. परंतु या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ १००० वा वनडे सामना,जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये खेळणार आहे.
भारतीय संघाकडून १०० व्या सामन्यात कपिल देव यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तर २०० व्या सामन्यात मोहम्मद अझहरुद्दिन, ३०० व्या सामन्यात सचिन तेंडुलकर, ४०० व्या सामन्यात मोहम्मद अझहरुद्दिन, ५०० व्या सामन्यात सौरव गांगुली, ६०० व्या सामन्यात वीरेंद्र सेहवागने संघाचे नेतृत्व केले होते. तर ७००,८०० आणि ९०० व्या सामन्यात एमएस धोनीने संघाचे नेतृत्व केले होते.आता १००० व्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
“हा निर्णय विराटच्या नेतृत्व कारकिर्दीतील मास्टरस्ट्रोक”
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची झाली ‘फँटॅस्टिक पंत’सोबत भेट; पाहा खास फोटो
हे नक्की पाहा: