भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये लवकरच ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) बुधवारी (२६ जानेवारी ) १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन झाले आहे. तर, काही युवा खेळाडूंना देखील पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. विराट कोहलीने गेल्या ७ वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलेला.
आता विराट कोहली केवळ एक फलंदाज म्हणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणारं आहे. त्याच्यावर नेतृत्वचा कुठलाही दबाव नसणार आहे. मार्च २०२१ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत हे दोघेही एकत्र खेळताना दिसून आले होते. त्यानंतर भारतीय संघाने कसोटी आणि टी२० क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. विराट कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असा आहे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
महत्वाच्या बातम्या :
आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती
हे नक्की पाहा: