सिडनी। रविवारी(२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ऍरॉन फिंच आणि डेविड वॉर्नरने शानदार फलंदाजी केली. या दोघांनीही शतकी भागीदारी रचली. या सामन्यात सामन्यात फिंच आणि वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. ही त्यांची भारताविरुद्धची सलग दुसरी शतकी भागीदारी ठरली.
भारताविरुद्ध सलग तीन सामन्यात सलामीला शतकी भागीदारी –
भारतासाठी हा सलग तिसरा वनडे सामना होता, ज्यात त्यांच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. याआधी शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातही फिंच आणि वॉर्नरने १५६ धावांची सलामी भागीदारी भारताविरुद्ध केली होती.
तसेच त्याआधी माऊंट मोंगनूई येथे ११ फेब्रुवारीला झालेल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्स आणि मार्टिन गप्टिल या सलामीवीरांच्या जोडीने भारताविरुद्ध १०६ धावांची सलमी भागीदारी रचली होती.
त्यामुळे भारताच्या ९८८ वनडे सामन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे भारताविरुद्ध सलग तीन वनडे सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आहे.
ऑस्ट्रेलियाची पहिली फलंदाजी –
रविवारच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या फलंदाजांनी योग्य ठरवला आहे. त्यांच्याकडून ऍरॉन फिंच(६०), डेविड वॉर्नर(८३) आणि स्टिव्ह स्मिथ या पहिल्या तीनही फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या वनडे दरम्यान मैदानातच फिंच- केएल राहुलची मस्ती, पाहा व्हिडिओ
अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज