आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत न घडलेली गोष्ट रविवारी (१८ ऑक्टोबर) घडली. ती म्हणजे एकाच दिवशी खेळण्यात आलेले दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. रविवारी खेळण्यात आलेला पहिला सामना हा सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
त्यानंतर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला.
दुपारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघानेही निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६३ धावाच केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताने ३ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.
तर संध्याकाळी खेळण्यात आलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाब संघानेही ६ विकेट्स गमावत १७६ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २ विकेट्स गमावत ५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघानेही ५ धावाच केल्या. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर खेळावी लागली.
दुसऱ्यांदा खेळण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मुंबई इडियन्सने १ विकेट्स गमावत ११ धावा केल्या. त्यानंतर मुंबईच्या धावांचा पाठलाग करताना पंजाबने १५ धावा करत सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-ड्रामा सुपर ओव्हरचा! आरसीबीचा मुंबई इंडियन्सला धक्का
-सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी
-सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
-हैदराबादला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाताला तब्बल ११ वर्षांनी सुपर ओव्हरमध्ये यश
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या