---Advertisement---

सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

---Advertisement---

मुंबई । आयपीएल 2020 चा दुसरा सामना अनिश्चिततेने भरलेला होता. रविवारी दुबईत खेळला गेलेला दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे हा सामना सुपरओव्हर पोहचणारा आयपीएल 2020 चा पहिला सामना ठरला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकला आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची चव चाखली.

नियमित २०-२० षटकानंतर दोन्ही संघांनी आठ विकेट्स गमावत 157 धावा केल्या.  त्यानंतर अंतिम निकालासाठी दोघांमध्ये सुपर ओव्हर झाला, त्यात दिल्लीने विजय मिळवला. सुपर ओव्हरच्या सामन्याबद्दल जाणून घेऊया. कॅगिसो रबाडाने दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी करायला आला. त्याचवेळी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरन यांनी डावाची सुरवात केली. पण हे दोघेही अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर बाद झाले. त्यामुळे पंजाबला सुपर ओव्हरमध्ये २ धावाच करता आल्या.

पंजाबने अवघ्या २ धावा केल्या. त्यामुळे ही आयपीएलच्या इतिहासातील सुपर ओव्हरमधील ही सर्वात कमी धावसंख्या बनली आहे. 

पंजाबने केवळ २ धावा केल्याने दिल्लीला विजयासाठी 3 धावांचे लक्ष्य मिळाले. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्याकडे पंजाबकडून दोन धावा वाचवण्याची जबाबदारी होती, तर रीषभ पंत आणि श्रेयर अय्यर दिल्लीला सामना जिंकून देण्यासाठी क्रीजवर आले. यावेळी त्यांनी ३ चेंडूत ४ धावा करत सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा

अशा पद्धतीने खेळाडूंना बाद न करण्याची रिकी पाँटिंगने दिली होती ‘या’ खेळाडूला ताकीद

केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम करणारा बनला पाचवाच यष्टीरक्षक

ट्रेंडिंग लेख –

मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---