fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी

IPL 13 th Season 2nd Match Between Delhi Capitals And Kings XI Punjab

September 20, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील पहिला सामना काल चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. तो सामना चेन्नईने ५ विकेट्सने जिंकला. तर स्पर्धेतील दुसरा सामना आज (२० सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात पार पडला. हा सामना बरोबरीत सुटला होता. परंतु दिल्लीने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

नाणेफेक जिंकून पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ८ विकेट्स गमावत १५७ धावा केल्या. दिल्लीने दिलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब संघाने २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या. त्यामुळे बरोबरीत सुटलेल्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २ विकेट्स गमावत २ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ४ धावा करत हा सामना आपल्या नावावर केला.

यापूर्वी पंजाबकडून फलंदाजी करताना मयंक अगरवालने ५९ चेंडूत सर्वाधिक ८९ धावा केल्या. यात ४ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. सोबतच कर्णधार केएल राहुलने २१ धावा केल्या, तर कृष्णाप्पा गौतमनेही २० धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त केवळ सर्फराज खानने १२ धावा करत २ आकडी धावसंख्या पार केली. मात्र इतर फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही.

दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि आर अश्विनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच मोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दिल्ली संघाची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. त्यांचे पहिले ३ फलंदाज अवघ्या १३ धावांवर बाद होत पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. परंतु पुढे फलंदाजीस आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरने ३ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या, तर क्षेत्ररक्षक फलंदाज रिषभ पंतनेही ३१ धावा केल्या. या दोघांनी संघाचा डाव सावरला. दरम्यान दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने अंतिम षटकांमध्ये धडाकेबाज खेळी करत केवळ २१ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. यामध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.

पंजाबकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सोबतच शेल्डन कॉट्रेलने २ विकेट्स, तर युवा गोलंदाज रवी बिश्नोईने १ विकेट आपल्या नावावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-केएल राहुलचा कर्णधार म्हणून पहिला निर्णय क्षेत्ररक्षणाचा, या धुरंदरला केले बाहेर

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया

-कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकलेल्या माजी खेळाडूने पुन्हा केले वादग्रस्त विधान; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

ट्रेंडिंग लेख-

-यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू

-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान

-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा


Previous Post

आयपीएल इतिहासातील ३ फलंदाज, ज्यांनी डावातील शेवटच्या ३ षटकात कुटल्यात सर्वाधिक धावा

Next Post

राजस्थान रॉयल्सला बसला जबरदस्त धक्का; हा खेळाडू सीएसकेविरुद्ध खेळणार नाही सामना

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Next Post

राजस्थान रॉयल्सला बसला जबरदस्त धक्का; हा खेळाडू सीएसकेविरुद्ध खेळणार नाही सामना

आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज

भारतीय क्रिकेट वर्तुळात सर्वाधिक चर्चा होत असलेल्या रवी बिश्नोईचे झाले आयपीएल पदार्पण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.