रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीला आजपासून सुरवात होत आहे.
२०१८ च्या या २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रांन्स, बेल्जियम, इंग्लंड आणि क्रोएशिया हे संघ उपांत्य फेरीत पोहचले आहेत.
यामध्ये मंगळवारी (१० जुलै) फ्रांन्स वि. बेल्जियम यांच्यात पहिला उपांत्य सामना होणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि क्रोएशिया बुधवारी (११ जुलै) अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी लढणार आहेत.
मात्र जागतिक फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला जर्मनी संघाला १९९८ नंतर प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले आहे.
For the first time since 1998 there will be no Germany in WC semi final #FifaWorldCup2018
— CricBeat (@Cric_beat) July 9, 2018
जर्मनीने २००२ साली उपविजेतेपद, २००६ आणि २०१० साली तिसरे स्थान आणि २०१४ साली फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होत.
बलाढ्य जर्मनीने २१ पैकी १८ फिफा विश्वचषकांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये त्यांनी ४ वेळा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.
रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात जर्मनीचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले.
गट फेरीतील तीन सामन्यात जर्मनीला एका सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.
यामध्ये स्वीडन विरुद्ध २-१ ने विजय, मेक्सिकोकडून १-० ने पराभव तर दुबळ्या दक्षिण कोरियाने २-० ने गतविजेत्या जर्मनीला पराभूत करत स्पर्धेबाहेर पाठवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-नदालचा हा फोटो का होतोय एवढा व्हायरल, काय आहे कारण?
-ये कौन हैं, कहासे पकडके लाते हो? गांगुलीच्या राग जेव्हा अनावर झाला