---Advertisement---

‘रनमशीन’ विराट कोहलीसाठी २०२० वर्ष ठरले वाईट; १२ वर्षांनंतर आली ‘अशी’ नकोशी वेळ

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 5:19 PM
---Advertisement---

कॅनबेरा। बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात मनुका ओव्हल स्टेडियमवर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या वनडे मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात टी२० आणि कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे बुधवारचा हा सामना भारताचा २०२० वर्षातील शेवटचा वनडे सामना ठरला आहे.

या वर्षात भारतीय संघाने ९ वनडे सामने खेळले आहेत. पण या ९ सामन्यात एकदाही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. त्याने या ९ सामन्यात ४७.८८ च्या सरासरीने ४३१ धावा केल्या. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा समावेश आहे. ८९ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

१२ वर्षात पहिल्यांदाच एकही शतक नाही. 

विराटसाठी सन २००९ नंतर हे पहिलेच असे वर्ष आहे, ज्यात त्याने वनडेमध्ये शतकी खेळी केलेली नाही. याआधी २००८ ला त्याने वनडेत शतक केले नव्हते. त्यानंतर त्याने २०१९ पर्यंत प्रत्येकवर्षी किमान एक तरी वनडे शतक त्याने केले आहे. मात्र यंदा त्याला ही कामगिरी करता आलेली नाही.

सन २००८ मध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने सन २०१७ आणि २०१८ या दोन वर्षी सर्वाधिक ६- ६ शतके वनडेमध्ये केली आहेत. १८३ धावा ही विराटची वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. ही खेळी त्याने २०१२ मध्ये केली होती.

सन २००८ पासून विराटच्या वनडे शतकांची संख्या 
२००८ – ० (सर्वोच्च धावा – ५४)
२००९ – १ (सर्वोच्च धावा – १०७)
२०१० – ३ (सर्वोच्च धावा – ११८)
२०११ – ४ (सर्वोच्च धावा – ११७)
२०१२ – ५ (सर्वोच्च धावा – १८३)
२०१३ – ४ (सर्वोच्च धावा – ११५*)
२०१४ – ४ (सर्वोच्च धावा – १३९*)
२०१५ – २ (सर्वोच्च धावा – १३८)
२०१६ – ३ (सर्वोच्च धावा – १५४*)
२०१७ – ६ (सर्वोच्च धावा – १३१)
२०१८ – ६ (सर्वोच्च धावा – १६०*)
२०१९ – ५ (सर्वोच्च धावा – १२३)
२०२० – ० (सर्वोच्च धावा – ८९)

महत्त्वाच्या बातम्या –

व्वा…भारीच ! सर जडेजाने डाइव्ह मारत घेतला ग्रीनचा अवघड झेल, पाहा व्हिडीओ

तडाखेबंद अर्धशतक ठोकत जडेजाचे मांजरेकरांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

अरर! तुफान फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा फलंदाज शतक पूर्ण करायलाच विसरला; ९९ धावांवर राहिला नाबाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---