पुणे। एलटीआय, झेन्सर या संघांनी प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत एलटीआय संघाने सीबीएसएल संघावर ५७ धावांनी मात केली. यात एलटीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१० धावा केल्या. एलटीआय संघाकडून सलामीवीर सिद्धार्थ ठाकूरने ५७ चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ७८, तर सुमीत पांडाने ३० चेंडूंत ४९ आणि आयुष अवस्थीने ३१ चेंडूंत ४१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीबीएसएल संघाला ५ बाद १४४ धावाच करता आल्या. यात अभिषेक खंबाटेचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याने ३५ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारसह ६० धावा केल्या.
यानंतर दुसऱ्या लढतीत सिद्धार्थ जलनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झेन्सर संघाने एचएसबीसी संघावर पाच गडी राखून मात केली. झेन्सर संघाने एचएसबीसी संघाला ६ बाद १३६ धावांत रोखण्यात यश मिळवले. यात सिद्धार्थने तीन गडी बाद केले. यानंतर झेन्सर संघाने विजयी लक्ष्य १९.१ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सिद्धार्थने ३३ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
१) एलटीआय – २० षटकांत २ बाद २०१ (सिद्धार्थ ठाकूर नाबाद ७८, सुमीत पांडा ४९, आयुष अवस्थी ४१, निखिल जोशी १-४३) वि. वि. सीबीएसएल – २० षटकांत ५ बाद १४४ (अभिषेक खंबाटे ६०, तनिष ३३, प्रतीकसिंग २-२३, आयुष अवस्थी १-१५).
२) एचएसबीसी- २० षटकांत ५ बाद १३६ (नविद श्रीनिवास ४४, धवल बडगुजर १९, सिद्धार्थ जलन ३-२७, मुझमिल खान २-३३) पराभूत वि. झेन्सर – १९.१ षटकांत ५ बाद १३९ (सिद्धार्थ जलन नाबाद ४५, अमित दीक्षित २९, संजयकुमार लोखंडे २-२१, नवीद श्रीनिवास १-१९)