पुणे (17 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजचा पहिला सामना सातारा विरुद्ध धाराशिव जिल्हा यांच्यात झाला. दोन्ही संघांनी आपले पाच ही सामने गमावले होते. त्यामुळे आज कोणता संघ विजय मिळवणार यांची उत्सुकता होती. दोन्ही संघानी आपल्या पहिल्या चढाईत गुण मिळवले. मध्यांतरा पर्यत सामना चुरशीचा झालेला बघायला मिळाला. सातारा कडून कुणाल जाधव व गणेश आवळे ने चपळ चढाया करत गुण मिळवले.
मध्यांतराला सातारा संघाकडे 14-12 अशी केवळ 2 गुणांची आघाडी होती. त्यानंतर 4 मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघ 15-15 असे बरोबरीत होते. पुढील मिनिटाला धाराशिव संघाने पहिल्यांदाच सामन्यात आघाडी मिळवली. सामन्याची शेवटची 8 मिनिटं शिल्लक असताना 24-21 अशी आघाडी सातारा संघाने मिळवली. साताराच्या पवनकुमार चव्हाण ने पकडीत 4 गुण मिळवले.
सातारा संघाने सामना 32-25 असा जिंकत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. तर धाराशिव संघाचा हा सहावा पराभव होता. सातारा कडून कुणाल जाधव ने चढाईत 7 गुण मिळवले. तर गणेश आवळे ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. प्रथमेश माने ने सुद्धा अष्टपैलू खेळ करत 5 पकडी केल्या. धाराशिव कडून अनिकेत भरती ने सर्वाधिक 7 पकडी केल्या. (First win for Satara team in Yuva Kabaddi series)
बेस्ट रेडर- कुणाल जाधव, सातारा
बेस्ट डिफेंडर- अनिकेत भारती, धाराशिव
कबड्डी का कमाल – अनिकेत भारती, धाराशिव
महत्वाच्या बातम्या –
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम
पुरुष संघाशी तुलना नको! WPL फायनलआधी ‘हे’ काय बोलून गेली आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना