---Advertisement---

‘लॉर्ड’ शार्दुल उर्वरित मालिकेत बसून राहणार बाकावर? ‘हे’ आहे कारण

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 9:53 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भारतीय संघाने इंग्लंडला १५१ धावांच्या मोठ्या फरकाने धूळ चारत मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने पुढील सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूरचा समावेश केला जाणार की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शार्दुल झाला होता दुखापतग्रस्त
नॉटिंघम येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू शार्दूल ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी केलेली. त्याने दोन्ही डावात प्रत्येकी दोन बळी मिळवलेले. मात्र, त्याचवेळी त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. संघाच्या फिजीओनीं योग्य त्या चाचण्या करत तो दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त नसल्याचे जाहीर केले होते.

इशांतने केली दमदार कामगिरी
शार्दुल ठाकूर दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाल्याने संघ व्यवस्थापनाने अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला संधी दिली. त्याने आपल्या अनुभवाचा योग्य फायदा उठवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोन्ही डावात मिळून त्याने पाच बळी आपल्या नावे केले. पहिल्या डावात मोईन अली व सॅम करन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत त्याने इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. दुसऱ्या डावातही त्याने संघाच्या गरजेनुसार बळी मिळवले.

तिसऱ्या सामन्यात खेळणार शार्दुल?
पहिला सामन्यानंतर दुखापतग्रस्त झालेला शार्दुल ठाकूर आता तंदुरुस्त असल्याचे वृत्त समोर येत आहे. असे असले तरी, हेडिंग्ले येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता कमी झालीय. इशांतने दुसऱ्या सामन्यात शानदार गोलंदाजी केल्याने, पहिल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करूनही शार्दुलला आता मालिकेतील उर्वरित सामन्यात बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते. शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील अप्रतिम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘इंग्लंड हा पराभव विसरणार नाही’, लॉर्ड्स कसोटीबाबत माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य

https://mahasports.in/21-years-ago-england-vs-west-indies-test-end-in-two-days/

‘हा नवा भारत, त्याचे श्रेय वेगवान गोलंदाजी विभागाला’, माजी भारतीय कर्णधाराने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---