---Advertisement---

जसप्रीत बुमराह दमदार पुनरागमनासाठी सज्ज, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 7:26 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मागील काही महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे संघातून विश्रांती घेतली होती. पण आता त्याची श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

गुवाहाटी (Guwahati) येथे शुक्रवारी (3 जानेवारी) बुमराहने भारतीय संघाच्या नेट सत्रात रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा सराव केला.

त्यामुळे आता तो श्रीलंकेविरुद्ध (India vs Sri Lanka) रविवारी होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यात पुनरागमन करणार असल्याचे दिसत आहे.

यामध्ये बुमराहने यॉर्कर चेंडूबरोबरच अनेक प्रकारचे बाऊंसर चेंडू फेकले. त्याचबरोबर त्याने शार्दूल ठाकूर आणि शिवम दुबेसोबत (Shivam Dube) गोलंदाजी केली. तसेच, त्याने सिंगल स्टंपचाही सराव केला.

https://twitter.com/BCCI/status/1213085613542576129

बुमराह सराव करतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, ते पाहून असे वाटते की तो चांगल्या लयीत असावा.

बुमराहबरोबर या सराव सत्रात क्षेत्ररक्षणाचा सराव करताना भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या खेळाडूंनी विद्युत प्रकाशात उंच झेल घेण्याचा सराव केला.

बुमराहने आतापर्यंत 42 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 20.17 च्या सरासरीने 51 विकेट्स घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---