ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटविश्वात एका महासंग्रामाला सुरूवात होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात पुरूषांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ (Team India for T20 World Cup)जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे तर केएल राहुल उपकर्णधार आहे. तसेच प्रथमच 136 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा रोहित भारतीय संघाचे आयसीसी विश्वचषकाच्या स्पर्धेत कर्णधारपद भुषविणार आहे. या संघामध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांनी भारताचे नेतृत्व केले आहे आणि आता ते रोहितच्या कर्णधारपदाखाली खेळणार आहेत.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवडसमितीने संघाची घोषणा केली. यामध्ये फलंदाजीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याबरोबर विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. विराटने 2017 ते 2022 दरम्यान भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक असे 40 कसोटी सामने जिंकले. यावेळी त्याचा एकूण फलंदाजीचा फॉर्मही चांगला राहिला. त्याने 144 सामन्यांत 57.52च्या सरासरीने 8283 धावा केल्या.
राहुलनेही 8 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. नुकतेच त्याने आशिया चषकाच्या सुपर फोरमधील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. हा सामना भारताने 101 धावांनी जिंकला त्याचबरोबर विराटने या सामन्यात आंंतरराष्ट्रीय टी20तील पहिले शतक केले.
टी20 विश्वचषकासाठीच्या संघात अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि विकेटकीपर रिषभ पंत यांचा देखील समावेश आहे. पंड्याने याचवर्षी आयर्लंड दौऱ्यातील टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. दोन सामन्यांची ही मालिका भारताने 2-0 अशी जिंकली होती. तसेच त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यातील शेवटच्या टी20 सामन्यातही कर्णधारपद भुषविले आहे. हा सामना 88 धावांनी जिंकला. तसेच पंतनेही याचवर्षी भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व केले. त्याने जून महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारताचे कर्णधारपद सांभाळले. ही मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली.
भारत जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना एकमेव कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने भारताचे नेतृत्व केले होते. तेव्हा रोहितला कोरोना झाल्याने बोर्डने कर्णधारपदाची जबाबदारी बुमराहवर सोपवली. एजबस्टनमध्ये झालेल्या या कसोटीमध्ये त्याने फलंदाजी करताना 38 धावा केल्या आणि 5 विकेट्सही घेतल्या होत्या. हा सामना भारताने 7 विकेट्सने गमावला.
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात नव्या अवतारात दिसणार भारतीय संघ, जर्सीचा पहिला लूक आला समोर
अरे, अशी काय टीम निवडलीये? अश्विनपेक्षा दुप्पटीने विकेट्स घेऊनसुद्धा ‘तो’ टी20 विश्वचषक संघाबाहेर
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज