मंगळवारी (९ ऑगस्ट) क्रिकेटविश्वासाठी एक वाईट बातमी समोर आली. क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज पंच रूडी कर्स्टन (Rudi Koertzen) याचे कार अपघातात निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या रिव्हर्सडेलमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात त्यांच्यासह अजून ३ जणांचे निधन झाले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अँड्र्यू सायमंड्सचे देखील कार अपघातात निधन झाले होते. आपण या लेखात अशा पाच क्रिकेटपटूंविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांनी कार अपघातात स्वतःचे प्राण गमावले.
रुनाको मॉर्टन (२०१२) –
वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू रुनारो मॉर्टन (Runako Morton) याचे अपघाती निधन झाले होते. २०१२ साली हा अपघात घेतला होता. त्यावेळी मॉर्टन ३३ वर्षांचा होता. त्रिनिदादच्या चेस गावात हा अपघात झाला होता. त्याने वेस्ट इंडीज संघासाठी १५ कसोटी, ५६ एकदिवसय आणि ७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. या फॉरमॅटमध्ये त्यांने अनुक्रमे ५७३, १५१९ आणि ९६ अशा धावा केल्या.
अँड्र्यू सायमंड्स (२०२२) –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचे अपघाती निधन क्रिकेट विश्वासाठी धक्कादायक होते. १४ मे २०२२ रोजी रात्रीच्या वेळी कार अपघातात त्याने अखेरचा श्वास घेतला. माध्यमांमधील वृत्तांनुसार एलिस नदीच्या पुलाजवळील हार्वे रेंज रोडवर सायमंड्सची गाडी पलटी झाली होती. अपघातानंतर सायमंड्सला वाजवण्यासाठी मेडिकल टीमने पूर्ण प्रयत्न केले, पण रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले नाहीत. सायमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या तिन्ही प्रकारांमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे १४६२, ५०८८ आणि ३३७ धावांची नोंद आहे.
बेन हॉलिओके (२००२) –
इंग्लंड क्रिकेटसाठी २४ मार्च २००२ हा दिवस धक्कादाय होता. याचदिवशी त्यांचा क्रिकेटपटू बेन हॉलिओके (Ben Hollioake) याचे कार अपघातात निधन झाले होते. हॉलिओकेची कार रोडवरून खाली घसरली आणि शेजारील भिंतीवर आदळली. गाडीत त्याची प्रेयसी देखील होती, पण तिचे प्राण वाचले. असे असले तरी, तिला देखील गंभीर दुखापत झाली होती. कोमामधून बाहेर येण्यासाठी तिला तीन आढवड्यांचा कालावधी लागला. हॉलिओकेची कारकिर्दीत पाहिली, तर त्याने अवघ्या २ कसोटी आणि २० एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
मंजुरल इस्लाम राणा (२००७)-
बांगलादेशचा युवा खेळाडू मंजुरल इस्लाम राणा (Manjural Islam Rana) याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बांगलादेश संघ २००७ साली टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यावर होता आणि यादरम्यानच्या काळात मंजुरलचे अपघाती निधन झाले. त्याची मोटारलायकल रस्तावर एका मिनी बसला धडकली आणि नंतर कडेला असलेल्या विजेच्या खांबावर गेली होती. त्याच्या कारकिर्दीचा विचार केला, तर बांगालदेशाठी त्याने ६ कसोटी आणि २६ वनडे सामने खेळले आहेत.
एरझा मोसेली (२०२१) –
वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटपटू एरझा मोसेली (Ezra Moseley) यांचे मागच्या वर्षी बारबाडोसमध्ये निधन झाले. मोसेली यांनी १९९० ते १९९१ यादरम्यान काळात वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी वेस्ट इंडीजसाठी १३ विकेट्स घेतल्या आहेत, तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७९ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अवघ्या ६ सेकंदात घेतलाय अफलातून झेल, व्हिडिओ पाहून तु्म्हीही व्हाल थक्क
शॉकिंग! दिग्गज क्रिकेट अंपायरचा कार अपघातात जागीच मृत्यू, भारताशी होते खास नाते
‘मिशन एशिया कप’ फत्ते करण्यासाठी कोहलीने बनवलाय प्लॅन, मुंबईतून करणार सुरुवात