क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू ज्यांना क्रिकेटच्या एकदिवसीय, टी20 आणि कसोटी या तीनही फारमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. काहींना एकदिवसीय आणि टी20 मध्ये संधी मिळाली, तर काहींना फक्त कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सध्याच्या काळातही असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना क्रिकेटच्या एका किंवा दुसऱ्या फॉरमॅटमध्ये खेळता आलेले नाही. या बातमीद्वारे आपण अशा 5 दिग्गज खेळाडूंची नावे पाहणार आहोत, जे टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये हीरो ठरले पण त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
किराॅन पोलार्ड- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले. टी20 क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. पोलार्डनं वेस्ट इंडिजसाठी 123 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26च्या सरासरीने आणि 94.4च्या स्ट्राईक रेटने 2,706 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याने 101 सामन्यात 25.3च्या सरासरीने आणि 135.1च्या स्ट्राईक रेटने 1,569 धावा केल्या आहेत. परंतू त्याला कधीच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.
ॲडम झाम्पा- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ॲडम झाम्पा (Azam Zampa) देखील आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळला नाही. त्याने ऑस्ट्रेलियासाठी संघासाठी 99 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळले आहेत. उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या झाम्पाने जगातील दिग्गज फलंदाजांना त्याच्या गोलंदाजांनी हैराण केले. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 169 आणि टी20 मध्ये 105 विकेट्स आहेत. परंतू उत्कृष्ट कामगिरी करुनही त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
निकोलस पूरन– वेस्ट इंडिजच्या (West Indies) दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या निकोलस पूरनने (Nicholas Pooran) एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत 61 एकदिवसीय आणि 95 टी20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पुरननं 39.7च्या सरासरीने आणि 99.2च्या स्ट्राईक रेटने 1,983 धावा आहेत. टी20 मध्ये त्याने 26.6च्या सरासरीने आणि 135.9च्या स्ट्राईक रेटने 2,076 धावा केल्या आहेत. परंतू तरीही तो आतापर्यंत कसोटी क्रिकेट खेळू शकला नाही.
डेव्हिड मिलर- दक्षिण आफ्रिकेच्या स्टार फलंदाजांपैकी एक असणारा डेव्हिड मिलर (David Miller) सुद्धा अद्याप कसोटी क्रिकेट खेळू शकला नाही. मिलरने आफ्रिकेसाठी 173 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4,458 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 42आहे आणि स्ट्राईक रेट 103.3 आहे. मिलरने 125 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2,437 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 33.4 आहे आणि स्ट्राइक रेट 140.5 आहे.
युझवेंद्र चहल- भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) अद्याप कसोटीत खेळण्याची संधी मिळालेली नाही. या स्टार फिरकीपटूनं 72 एकदिवसीय सामन्यात भारतासाठी 121 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी 80 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 96 विकेट्स घेतल्या आहेत. या पाच खेळाडूंना आपल्या देशाकडून अद्याप एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
रोहित शर्माचा विसरभोळेपणा, सामानाच्या बॅगा किती आणल्या हेच विसरला!; VIDEO व्हायरल
हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या जवळ! अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच भारतीय
Asia Cup Final; फायनलमध्ये भारतापुढे श्रीलंकेचं आव्हान, भारत-श्रीलंका कोणाचं पारडं जड?