आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. दोन्ही देशातील आणि जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारतीय संघाने विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही सामने सराव सामने दणक्यात जिंकले आहेत. यादरम्यान भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्याच वेळी, सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत चांगली नव्हती. पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला, पण दक्षिण आफ्रिकेसमोर पराभवाला सामोरे जावे लागले. पण असे असले तरी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याची उत्सुकता नेहमीच शिगेला असतो. या सामन्यात पाकिस्तानचे कोणते पाच खेळाडू भारतीय संघाला त्रास देऊ शकतात याबद्दल जाणून घेऊ या.
बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्याचा कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीच्या तुलनेत अधिक चांगला असतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात तो लवकर बाद झाला, पण वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावण्यात तो यशस्वी ठरला होता. बाबर आझम ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्याबाबत भारताला काळजी घ्यावी लागेल.
भारतीय संघ बाबरला लवकर बाद करण्याचा प्रयत्न करेल. बाबर पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात खेळणार आहे. याआधी २०१६ च्या टी -२० विश्वचषकात त्याला पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते, पण नंतर त्याला संधी देण्यात आली नाही. याशिवाय बाबर आझम प्रथमच भारताविरुद्ध टी२० सामना देखील खेळणार आहे.
शोएब मलिक
दोन्ही संघात शोएब मलिकइतका आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेला दुसरा क्रिकेटपटू नाही. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेणारा शोएब बऱ्याच काळापासून टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी टी२० फलंदाज आहे. त्याने भारताविरुद्ध ८ टी -२० सामन्यात १६४ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे.
तो मधल्या फळीतील एक मजबूत फलंदाज आहे आणि झटपट धावा काढण्यासाठी तो ओळखला जातो. भारतीय संघ प्रयत्न करेल की शोएब मलिक जास्त काळ खेळपट्टीवर राहू नये.
मोहम्मद हाफिज
भारताविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये मोहम्मद हाफिज दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी फलंदाज आहे. तो वर्षानुवर्षे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भार उचलत आहे. हाफिज आता ४१ वर्षांचा झाला आहे, पण त्याने याचे कधीच दडपण घेतले नाही. तो कोणत्याही युवा क्रिकेटपटूपेक्षा जास्त क्रिएटिव्ह शॉट्स खेळतो. हेच कारण आहे की पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त तो जगातील अनेक टी-२० लीगमध्ये सतत खेळत आहे.
हाफिजने भारताविरुद्ध सात सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर १५६ धावा आहेत. यादरम्यान त्याने भारताविरुद्ध दोन अर्धशतकेही केली.
मोहम्मद रिझवान
भारताला यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानपासूनही सावध राहावे लागेल. कारण तो बराच काळ क्रिकेटच्या सर्व प्रकारात उत्कृष्ट फलंदाजी करत आहे. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रिझवानने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व राखले आहे. तो पहिल्यांदाच टी -२० विश्वचषकात खेळणार आहे. रिझवान पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी -२० सामन्यात खेळताना दिसणार आहे.
मोहम्मद रिजवानने पाकिस्तानसाठी ४३ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०६५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकासह ८ अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
शाहीन शाह आफ्रिदी
डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी सध्या पाकिस्तानचा नंबर एकचा गोलंदाज आहे. इतिहास साक्षी आहे की डाव्या हाताचे गोलंदाज अधिक धोकादायक असतात. त्याच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागेल. शाहीनने आजपर्यंत भारताविरुद्ध एकही टी -२० सामना खेळलेला नाही. पण भारतीय संघाने त्याला सहज घेऊन चालणार नाही. शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”
श्रीलंकेने नेदरलँड्सचा ४४ धावांत धूव्वा उडवत मिळवला दणदणीत विजय, ‘हा’ विक्रमही केला नावावर
आता रंगणार सुपर १२ फेरीचा थरार! कधी, कुठे होणार सर्व सामने, जाणून घ्या एका क्लिकवर






