इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी आणि टी२० मालिकेचा टप्पा पार पाडल्यानंतर दोन्ही संघ वनडे मालिका खेळत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी२० मालिकेतील सर्व सामने खेळवले गेले होते. या मालिकेतील पहिले २ सामने दर्शकांच्या उपस्थितीत झाले होते. अशातच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पाहण्यासाठी आलेले काही दर्शक कोरोनाच्या विळख्यात सापडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
अहमदाबाद मिररमधील वृत्तानुसार, पहिला टी२० सामना पाहण्यासाठी गेलेले आयआयएम अहमदाबादचे ५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काही दिवसांपुर्वी आयआयएम अहमदाबादमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यादरम्यान एकूण २२ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये भारत-इंग्लंड टी२० सामना पाहायला गेलेल्या ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचीही कोरोना चाचणी केली जात आहे.
आयआयएम अहमदाबादमध्ये (Indian Institute of Management Ahmedabad) २५०० विद्यार्थी राहतात. यातील जवळपास सर्व विद्यार्थी कॅम्पसमध्येच राहतात आणि महत्त्वाच्या कामासाठी ये-जा करत असतात. आयआयएमच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता विद्यार्थ्यांवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक वर्गाची ऑनलाइन परीक्षा, खाणावळीत सोशल डिस्टेंसिंगचे पालन या सर्व गोष्टी बारकाईने पाळल्या जात आहेत.
मात्र काही विद्यार्थ्यांनी आरोप केले आहेत की, कॅम्पसमध्ये संक्रमित विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले जात नाही. त्यामुळेच येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आयआयएमने हे आरोप फेटाळले आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाच सामन्यांची टी२० मालिका भारताने ३-२ ने जिंकली. यानंतर उभय संघ पुण्यात वनडे मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिला सामना २३ मार्च रोजी झाला असून भारताने ६६ धावांनी विजय मिळवला होता. वनडे सामने प्रेक्षकांविना खेळवले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय!! ट्रेंट बोल्टने डाइव्ह मारत टिपला भन्नाट झेल; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
“विराट कोहलीने धावा करायला नको, कारण…”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे भाष्य
INDvENG: दुसऱ्या वनडेत इंग्लंडने जिंकली नाणेफेक; पाहा कुणाला मिळाली जखमी श्रेयस अय्यरच्या जागी संधी