fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ खेळाडू खेळू शकतात आयपीएल २०२०

September 3, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


आयपीएलमध्ये खेळणे जसे प्रत्येक युवा भारतीय क्रिकेटपटुचे लक्ष असते तसेच विदेशी खेळाडू सुद्धा आयपीएल खेळण्यास फार इच्छुक असतात. आयपीएल सारख्या मोठ्या मंचावर दमदार प्रदर्शन करून अनेक विदेशी खेळाडूंनी नाव कमावले. सोबतच, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीदेखील त्यांना लाभली. कायरन पोलार्ड, शॉन मार्श, क्रिस लिन यांसारख्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये देखणी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला.

आयपीएल २०२० संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये होत आहे आणि कोविड-१९ मुळे जर काही परदेशी खेळाडूंनी आपली नावे माघारी घेतली तर त्यांच्या जागी दुसऱ्या परदेशी खेळाडूंना संधी मिळू शकते. आज आपण अशाच पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे या शर्यतीत पुढे असतील.

१) एविन लुईस (Evin Lewis)

वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस हा ज्या संघाला आक्रमक सलामीवीराची गरज असेल त्या संघासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नवीन चेंडूचा सामना करताना लुईस स्फोटक सुरुवात देऊ शकतो. डावखुरा लुईस आखूड टप्प्याच्या चेंडूचा चांगला खेळतो.

आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दोन शतके नावावर असलेला लुईस याआधी, आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघात दोन वर्ष सहभागी होता. त्याने १६ सामन्यात १३१ च्या स्ट्राईक रेटने ४३० धावा केल्या आहेत.

२) कुसल परेरा (Kusal Perera)

श्रीलंकेचा सद्यस्थितीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून कुसल परेरा ओळखला जातो. कुसल परेरा असा खेळाडू आहे जो, आपल्या आक्रमक शैलीने आपल्या दिवशी कोणत्याही गोलंदाजी आक्रमणावर वर्चस्व गाजवू शकतो.

सलामी ते सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. तो सुंदर ड्राईव्ह आणि उत्तुंग षटकार मारु शकतो. आक्रमक फलंदाजासोबत तो यष्टिरक्षक सुद्धा आहे.

याआधी, २०१३ साली त्याची निवड राजस्थान रॉयल्ससाठी झाली होती. तेव्हा तो फक्त २ सामने खेळू शकला.

३) कार्लोस ब्रेथवेट ( Carlos Brathwaite)

२०१६ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम षटकात बेन स्टोक्सला सलग चार षटकार मारत वेस्ट इंडिजला अशक्यप्राय विजय मिळवून देत कार्लोस ब्रेथवेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ब्रेथवेट त्याच्या विनाशकारी फलंदाजीमुळे खेळाचा निकाल बदलू शकतो. फलंदाजीसोबतच मध्यमगती गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यादेखील ब्रेथवेटच्या जमेच्या बाजू आहेत.

ब्रेथवेटला आयपीएल खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. दिल्ली, कोलकत्ता आणि हैदराबाद या संघांसाठी मिळून त्याने १६ सामने खेळले आहेत.

४) बेन कटिंग (Ben Cutting)

ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रीय संघाबाहेर असलेला बेन कटिंग हा अष्टपैलू खेळाडू आपल्या तुफानी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन १०-१५ चेंडूत सामन्याचा नूर पालटण्याची त्याची क्षमता आहे. आक्रमक फलंदाजी सोबत,तो आपल्या संघासाठी प्रमुख गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो.

बेन कटिंग आयपीएल मधील प्रमुख विदेशी खेळाडूंपैकी एक आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या संघांसाठी त्याने आपले हात आजमावले आहेत. कटिंगने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २१ सामने खेळुन १६९ च्या स्ट्राईक रेटने २३८ धावा व १० बळी मिळवले आहेत. २०१६ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्याचा तो सामनावीर होता.

५) मॅट हेन्री (Matt Henry)

दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता असलेला, मॅट हेन्री कोणत्याही संघाची गरज बनू शकतो. हा २८ वर्षीय किवी वेगवान गोलंदाज ,वेगवान गोलंदाजांच्या जराशा मदत करणाऱ्या खेळपट्टीवर थैमान घालू शकतो. आपल्या विविधतेने फलंदाजांना वेठीस धरण्याची कला त्याच्याकडे आहे.

वेगवान गोलंदाजी सोबत तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन फटकेबाजी करण्याची ताकद ठेवतो. २०१९ विश्वचषकात त्याने १४ बळी मिळवले होते.

मॅट हेन्री याआधी चेन्नई आणि पंजाब या संघांचा सदस्य राहिला आहे. चेन्नईकडून त्याला पदार्पणची संधी मिळाली नाही तर पंजाबकडून तो फक्त दोन सामने खेळू शकला. ज्यात त्याला फक्त एक बळी घेता आला.


Previous Post

कॅप्टन वगैरे तुमच्या देशात! आयपीएलमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळलेले दिग्गज

Next Post

आयपीएल २०२० मध्ये परदेशी क्रिकेटर नसल्यास या ५ युवा भारतीय खेळाडूंना होईल जोरदार फायदा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
क्रिकेट

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/CricketWorldCup & BCCI

आयपीएल २०२० मध्ये परदेशी क्रिकेटर नसल्यास या ५ युवा भारतीय खेळाडूंना होईल जोरदार फायदा

Photo Courtesy: Twitter/ IPL & Mipaltan

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.