सध्या सुरू असलेल्या एमर्जिंक एशिया कपमध्ये भारत अ आणि पाकिस्तान अ संघ बुधवारी (19 जुलै) आमने सामने आले. यश धूल भारतीय संघाचा कर्णधार असून नाणेफेक गमालल्यामुळे भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याने प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा अर्धा संघ एकट्यानेच तंबूत धाडला.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) याने एकट्याने पाच विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला 8 षटके गोलंदाजी करावी लागली आणि यादरम्यान 42 धावा त्याच्याकडून खर्च झाल्या. भारताच्या या युवा अष्टपैलूचे हे प्रदर्शन पाहून जाणकार आणि चाहत्यांकडून त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. हंगरगेकरच्या या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघ डावातील 2 षटके शिल्लक असतानाच 205 धावा करून सर्वबाद झाला. दरम्यान हंगरगेकर एमर्जिंक एशिया कपमध्ये पाच विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी मागच्या सामन्यात 6 षटकात 33 धावा खर्च करत नेपाळच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच मागच्या एमर्जिंक एशिया कपमध्ये खेळलेल्या दोन सामन्यात त्याने आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या आहेत. (Five-wicket haul for Rajvardhan Hangargekar against Pakistan in Emerging Asia Cup. )
महत्वाच्या बातम्या –
BANvsIND । दुसऱ्या वनडेत आलं जेमिमा नावाचं वादळ! भारताचा मोठा विजय
काय राव! बड्डे ईशानचा आणि रोहितने मागितले गिफ्ट, म्हणाला, ‘तूच टीम इंडियासाठी…’