भारताचा कसोटी कर्णधार (Indian test captain) विराट कोहली (Virat Kohli) २०२१ मध्ये सतत चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे या संपूर्ण वर्षातील प्रदर्शन जरी अपेक्षित नसले, तरी चाहत्यांमध्ये तो नेहमीच चर्चेत राहिला. गुगलच्या माहितीनुसार विराट कोहली यावर्षी सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटपटू ठरला आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद, आयपीएल फ्रेंचायझीचे कर्णधारपद, खराब फॉर्म, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे कोहलीकडे यावर्षी सर्वांचेच लक्ष आकर्षित झाले होते.
भारताच्या कसोटी संघाने यावर्षी कोहलीच्या नेतृत्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. यावेळी कोहलीच्या नेतृत्वाची चर्चा झाली होती, पण दुर्दैवाने भारत या सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर यावर्षी त्याने आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्सच्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम खेळला, पुढच्या हंगामापासून तो आरसीबीचे नेतृत्व करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
टी-२० विश्वचषक संपल्यानंतर त्याने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. टी-२० संघाचे कर्णधापद सोडण्याची घोषणा त्याने विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच केली होती. त्यानंतर तो सतत चर्चेत राहिला.
अधिक वाचा – अहमदाबाद फ्रँचायझीचा वाद मिटणार? संघमालक सीवीसी कॅपिटलबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयने विराटची इच्छा नसताना देखील त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि रोहित शर्मावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यावर अनेक वादांना तोंडू फुटले आणि सोशल मीडियावर देखील सर्वत्र याच गोष्टीची चर्चा होती.
मागच्या सहा महिन्यात विराटला इंटरनेटवर ९६ लाख वेळा सर्च केले गेले आहे. महिन्यांमध्ये विचार केला, तर विराटला प्रत्येक महिन्याला सरासरी १६.२ लाख वेळा सर्च केले जाते. रोहित शर्माचा (Rohit Sharma) विचार केला तर २०२१ मध्ये त्याला ९.७ लाख वेळा सर्च केले गेले आहे आणि तो विराटनंतरचा यावर्षी सर्वाधिक सर्च केला गेलेला दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
व्हिडिओ पाहा – जगातील कोणत्याही फलंदाजाला १० प्रकारे तुम्ही करु शकता बाद
विराटकडून टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गेले असले, तरी तो कसोटी संघाच्या कर्णधारपदावर कायम आहे. विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे आणि २६ डिसेंबरपासून संघाला तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेनंतर भारताला या दौऱ्यात एकदिवसीय मालिका देखील खेळायची आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकांपूर्वी रवी शास्त्रींचा हटके अंदाज, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल
सेंच्युरियन कसोटीत रिषभ पूर्ण करणार सर्वात वेगवान शतक? धोनीला टाकणार मागे?