---Advertisement---

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकांपूर्वी रवी शास्त्रींचा हटके अंदाज, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

Ravi Shastri
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (South Africa tour of India) आहे. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबर पासून होणार आहे. तत्पूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) एका नवीन अवतारात दिसले आहेत.

उभय संघातील मालिका स्टार स्पोर्ट्स चॅनलवर दाखवल्या जाणार आहेत. आता चॅनलने मालिका सुरू होण्यापूर्वी एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये रवी शास्त्री दिसत आहेत.

भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यात अद्याप एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. अशात यावेळी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ विजयाची दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रोमो बनवला गेला आहे आणि त्याचे नाव ‘फर्स्ट का थर्स्ट’ (first ka thirst) असे दिले गेले आहे. या प्रोमोत शास्त्री भारतीय संघाच्या दक्षिण अफ्रिकेतील कामगिरीविषयी बोलत आहेत आणि शेवटी त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाची फिरकी देखील घेतली आहे.

अधिक वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘या’ पंचरत्नावर असेल सर्वांची नजर

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या या प्रोमोच्या सुरुवातीला रवी शास्त्री किचनमध्ये सूप बनवताना दिसत आहेत. ते म्हणातात की, तुम्ही मला या अवतारात पहिल्यांदाच पाहत आहेत. यानंतर ते ‘फर्स्ट का थर्स्ट’ याचा खुलासा करतात. ते म्हणतात, भारताने १९९२ मध्ये दक्षिण अफ्रिकेतील पहिला कसोटी सामना डर्बनमध्ये खेळला. तेव्हा शास्त्री देखील या संघाचा भाग होते.

त्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेत कसोटी सामना जिंकला होता. शास्त्री यांनी राहुल द्रविडच्या या कामगिरीचा देखील उल्लेख केला. परंतु, भारतीय संघाने आतापर्यंत एकदाही दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. आगामी मालिकेत संघ ही तहान भागवण्याच्या प्रयत्नात असेल. यापूर्वी २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारताने पहिली कसोटी मालिका जिंकली होती. शास्त्रींच्या मते दक्षिण अफ्रिका दौऱ्यातही संघ अशाच प्रकारे विजय मिळवू शकतो.

समालोचकाच्या भूमिकेत दिसू शकतात शास्त्री
नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक संपल्यानंतर शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी शास्त्री समालोचनाचे काम करत होते. आता ते पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसतील, असा अंदाज बांधला जात आहे. चाहतेही त्यांना जुन्या अंदाजात पाहण्यासाठी उत्साहीत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपासून टीम इंडियाला असेल धोका, माजी भारतीय दिग्गजाने केले सावध

आयपीएल २०२२ पूर्वी सनरायझर्सची मोठी घोषणा; तब्बल ६ दिग्गजांचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश

व्हिडिओ पाहा – आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत

आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत | Batsman without Ducks in ODI Cricket

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---