---Advertisement---

स्मृती मानधनाचा पराक्रम! मिथाली-हरमनप्रीतच्या खास क्लबमध्ये एंट्री

On: रविवार, मे 4, 2025 4:45 PM
Smriti Mandhana
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकामध्ये आहे. जिथे ते श्रीलंका आणि साऊथ आफ्रिका विरुद्ध ट्राय सिरीज खेळत आहेत. चौथा सामना श्रीलंका आणि भारत संघात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने या सामन्यात एक पराक्रम केला आहे. असा कारणामा करणारी ती सातवी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

श्रीलंका विरुद्ध स्मृती मानधना तिच्या करिअरमधील 100 वा वनडे सामना खेळत आहे. ती फक्त 7वी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे, जिने 100 वनडे खेळले आहेत. पण तिचा 100 वा वनडे सामना म्हणावा तेवढा शानदार राहिला नाही. तिच्या बॅटने केवळ 3 चौकार या पारीमध्ये खेळताना दिसले. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राज भारतासाठी सर्वात जास्त वनडे सामने खेळणारी महिला खेळाडू आहे. तिने एकूण 332 सामने खेळले आहेत.

भारतासाठी खेळले गेलेले सर्वाधिक महिला वनडे सामने
232 मिताली राज
204 झुलन गोस्वामी
144 हरमनप्रीत कौर
127 अंजुम चोपडा
116 अमिता शर्मा
104 दीप्ती शर्मा
100 स्मृती मानधना

28 वर्षांच्या स्मृती मानधनाने या सामन्याआधी भारतासाठी 7 कसोटी 99 वनडे आणि 148 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये तिने 2 शतक आणि 3 अर्धशतक झळकावले आहेत. ज्या मदतीने 629 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये तिच्या नावावर 30 अर्धशतके तसेच 10 शतके सामील आहेत. त्या दरम्यान तिने 4288 धावा केल्या आहेत. तसेच टी20 मध्ये 30 अर्धशतक करत तिने 3761 धावा केले आहेत.

ट्राई सिरीज बद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने याआधी दोन सामने खेळले आहेत. टीम इंडियाने दोन्हीही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकाला 9 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात साउथ आफ्रिकेला 15 धावांनी पराभूत केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---