fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या लीगच्या खेळाडूंना सराव सत्रादरम्यान लैंगिंक संबंध ठेवता येणार नाहीत, कारण..

Football Premier League Corona Virus changes new Rules Bans Spitting and Sex

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या व्हायरसमुळे प्रत्येकाला आपापल्या घरात वेळ घालविण्याशिवाय पर्याय नाही. या व्हायरसचा जगभरातील क्रीडा स्पर्धांवर मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे अनेक मोठ-मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये फुटबॉल जगताचाही समावेश आहे.

फुटबॉलमधील प्रीमियर, ला लिगा (La Liga), सिरी ए (Serie A) आणि बुंदेसलिगा (Bundesliga) यांसारख्या मोठ्या स्पर्धादेखील स्थगित करण्यात आल्या आहेत. अनेक देशांमध्ये फुटबॉलचा पूर्ण हंगामच रद्द करण्यात आला आहे. नेदरलँडनेही लीग रद्द केली आहे. तसेच लीग वन म्हणजेच फ्रान्सच्या लीग्सने यापूर्वीच विजेता संघ घोषित केला आहे. लीग वनचा विजेता संघ पीएसजी झाला आहे.

बुंदेसलिगाचे खेळाडू ९ मेपासून सराव करण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. तरी त्यांच्यासमोर एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. या अटीनुसार, खेळाडूंना आपल्या पार्टनरमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोना व्हायरसचे (Corona Virus) लक्षण असतील, तर शारीरिक संबंध ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त खेळाडूंना मैदानापर्यंत वेगवेगळ्या वाहनांनी यावे लागणार आहे. तसेच लिफ्टसारख्या जागेवर बटन दाबण्यासाठी हाताच्या कोपऱ्याचा वापर करावा लागणार आहे. तरीही सध्या हा नियम जर्मनीमध्ये लागू करण्यात आला आहे. जर हा यशस्वी झाला तर, हा नियम प्रीमियर लीगमध्ये वापरला जाऊ शकतो.

ला लिगाच्या नवीन नियमांनुसार, सामन्यादरम्यान सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. पेनल्टी बॉक्समध्ये खेळाडूंना एकमेकांच्या अति जवळ येण्याची परवानगी नसेल. तसेच हा प्रयत्न केला जाईल की, ते कॉर्नरमध्ये एकमेकांपासून दूर राहतील.

स्पेन असोसिएशनच्या फुटबॉल डॉक्टर्स संघाने म्हटले की, “आता पूर्वीप्रमाणे काहीच होणार नाही. खूप काही बदलले असणार. तसेच खेळाडूंनाही एकमेकांच्या अति जवळ जाण्याची परवानगीही नसेल.”

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, “फिफाच्या (FIFA) वैद्यकीय समितीने सर्व फुटबॉल लीगला सामन्यादरम्यान खेळाडूंना थुंकण्यास कठोर बंदी घालण्यास सांगितले आहे. तसेच असे करणाऱ्या खेळाडूंना कठोर शिक्षा देण्याचे आवाहनही केले आहे.”

“जेव्हा आम्ही पुन्हा फुटबॉल खेळण्यास सुरुवात करेल, तेव्हा आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ की, थुंकणे हे कोणताही व्हायरस पसरविण्याची सोपी पद्धत आहे. याठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की, हे शक्य आहे का? याचेही उत्तर आमच्याकडे आहे. जो कोणी खेळाडू असे करेल, तेव्हा त्याला पिवळे कार्ड (Yellow Card) दाखविले जाऊ शकते,” असेही फिफाच्या वैद्यकीय समितीने सांगितले.

अर्सेनल पहिला प्रीमियर लीग क्लब होता ज्याने खेळाडूंना आयसोलेट ट्रेनिंग घेण्यास सांगितले होते. याच्यानुसार, खेळाडू वेगवेगळ्या मैदानावर आपापल्या चेंडूने सराव करतात. केवळ ५ खेळाडूंना एकत्र सराव करण्याची परवानगी होती. अनेक क्लब कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपल्यानंतर या नियमांना लागू  करणार आहेत.

मागील महिन्यात इंग्लंडची प्रीमियर लीग रद्द होण्यापूर्वी खेळाडूंच्या हात मिळविण्यावरदेखील बंदी घातली होती. अशामध्ये हा नियम फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये वापरला जाऊ शकतो.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेट कारकिर्द संपली की टीम इंडियाची ही खेळाडू सुरु करणार चहाची टपरी

-कमेंटमुळे वैतागलेल्या रोहित शर्माने लाईव्ह सेशनदरम्यानच वापरले अपशब्द

-रोहित जगातील गोलंदाजांना धु- धु धुतो, परंतु या दोन गोलंदाजांना जाम घाबरतो

You might also like