रशियात होत असलेल्या २०१८ च्या फिफा विश्वचषकात प्रथमच व्हीएआरचा (व्हीडीओ असिस्टंट रेफ्री) उपयोग गेला जात आहे.
फिफा विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी अनेकांनी या वादाग्रत व्हीएआर प्रणालीला विरोध केला होता.
या व्हीएआर प्रणालीचा प्रथम उपयोग इंग्लंडमध्ये २०१७ साली जर्मनी आणि इंग्लंडमधील थ्री लॉयन्स यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यात करण्यात आला होता.
तेव्हापासून या व्हीएआर प्रणालीबाबत उलट सुलट चर्चा व त्याचा वापर याबाबत वाद चालू आहेत.
असे असूनही फिफाने २०१८ च्या रशिययात सुरू असलेल्या विश्वचषकात उपयोग करण्याचे विश्वचषकापूर्वी नक्की केले होते.
रशियात सुरू असलेल्या २०१८ फिफा विश्वचषकात या व्हीएआर प्रणालीचा वापर गट फेरीच्या ४८ सामन्यांमध्ये एकून ३३५ वेळा करण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेत आत्तापर्यत झालेले सर्व १२२ गोल व्हीएआर प्रणालीच्या माध्यमातून चेक करण्यात आले आहेत.
या व्हीएआर प्रणालीच्या आधारे दिलेल्या सर्व निर्णयांपैकी ९९.३ टक्के निर्णय अचूक ठरले आहेत. त्यामुळे या प्रणालीवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.
गट फेरीच्या ४८ सामन्यांमधी ३३५ वेळा वापर केलेल्या व्हीएआरच्या माध्यमातून घेतलेलय्या १७ पैकी १४ रिव्हूयचे निर्णय बदलण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना
–फिफा विश्वचषक: आजपासून सुरु होणार नव्या विजेत्याचा शोध
–फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ