प्रत्येक देशात राहण्याचे वेगवेगळे नियम आणि अटी असतात. मात्र, काही वेळा हे नियम आणि अटी खेळाडूंकडून मोडले जातात. असेच काहीसे आता दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासोबत घडणार आहे. रोनाल्डोने नुकतेच मॅनचेस्टर युनायटेड क्लबशी करार मोडत सौदी अरेबियाच्या अल नासेर क्लबशी हातमिळवणी केली आहे. क्लब जॉईन केल्यानंतर तो सौदीला पोहोचला आहे. तो या क्लबमधून वर्षाकाठी जवळपास 1800 कोटी रुपये कमावणार आहे. इथे पोहोचल्यानंतर तो सौदी अरेबियाचा एक मोठा नियम मोडताना दिसेल.
खरं तर, ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियामध्ये त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) हिच्यासोबत राहणार आहे. सौदी अरेबियाच्या नियमानुसार, कोणीही व्यक्ती लग्नाच्या आधी गर्लफ्रेंडसोबत एकाच घरात राहू शकत नाही.
रोनाल्डोला मिळणार का शिक्षा?
याबाबतीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, रोनाल्डोला शिक्षा मिळणार नाही. कारण, रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. माध्यमांतील वृत्तानुसार, रोनाल्डोला त्याच्या खास दर्जामुळे शिक्षा दिली जाणार नाही. सौदी अरेबियाच्या वकिलांनी सांगितले आहे की, येथील अधिकाऱ्यांना या प्रकरणात दखल द्यायची नाहीये.
https://www.instagram.com/p/Cdat7bZA5KU/?hl=en
एका वकिलाने याबाबत म्हटले की, “अद्यापही लग्नाच्या कराराशिवाय एकत्र राहण्यावर कायदेशीररीत्या बंदी घातली जाते. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, कोणालाही सतावले नाहीये. अर्थातच, येथील कायदे तेव्हाच वापरले जातात, जेव्हा कोणती समस्या किंवा गुन्हा घडतो.”
दुसऱ्या एका वकिलाने या प्रकरणी म्हटले की, “सौदी अरेबियाचे अधिकारी, सध्या परदेशी व्यक्तींच्या बाबतीत दखल घेत नाहीयेत. मात्र, कायदेशीररीत्या लग्नाशिवाय एकत्र राहण्यावर बंदी घालणे सुरू आहे.”
https://www.instagram.com/p/Cb4-fw7ghwj/?hl=en
विशेष म्हणजे, रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज यांची भेट 2016मध्ये झाली होती. त्यावेळी रोनाल्डो रियल माद्रिद क्लबकडून खेळत होता. त्यांना एकूण पाच मुले आहेत. त्यांची नावे बेला, अलाना, ख्रिस्तियानो ज्युनिअर आहेत. तसेच, इतर ईवा आणि मातेओ ही दोन जुळी मुलेही आहेत. (footballer cristiano ronaldo set to break saudi arabia law by living with his girlfriend georgina rodriguez)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोनाल्डो वर्षाकाठी कमावणार 1800 कोटी, भारताच्या सर्वात महागड्या खेळाडूला हा आकडा गाठायला लागतील 150 वर्षे
हार्दिकच्या नेतृत्वाबाबत गुजरात टायटन्सच्या फिनिशरचे मोठे विधान; म्हणाला, “त्याच्यात ते गुण…”






