---Advertisement---

अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी

On: मंगळवार, जून 19, 2018 5:22 PM
---Advertisement---

जूलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या 19 वर्षाखालील भारतीय संघात अर्जून तेंडूलकरची निवड झाल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

सचिन तेंडूलकरचा मुलगा असल्याने त्याच्याबद्धल अनेक चर्चा होत आहेत.

भारतीय अ संघ आणि 19 वर्षाखालिल संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे भारतीय ‘अ’ संघाबरोबर इंग्लड दौऱ्यावर गेल्यामुळे त्यांच्या जागी सनथ कुमार यांची प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

1 जुलैपासून बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत श्रीलंका दौऱ्यापूर्वी सराव शिबीर होणार आहे.

सनथ कुमार यांना अर्जून तेंडूलकरविषयी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ” अर्जून तेंडूलकर मला बाकीच्या खेळाडूंसारखाच आहे. माझ्या समोर सारे खेळाडू समानच आहेत. या साऱ्या खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेणे हे माझे काम आहे.”

सनथ कुमार यांनी यापूर्वी आसाम आणि आंध्र प्रदेशच्या रणजी संघाला प्रशिक्षण दिले आहे. तसेच 2008च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाची जाबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे.

देशांर्गत क्रिकेटमध्ये सनथ कुमार यांचे प्रशिक्षक म्हणून मोठे नाव आहे.

आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या- 
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment