भारतीय संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यावर भारतानं 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. त्यामध्ये श्रीलंकेनं एकदिवसीय मालिकेत भारताचा 2-0 ने पराभव केला. भारताला आता यावर्षी एकही एकदिवसीय मालिका खेळायची नाही. त्याचबरोबर या एकदिवसीय मालिकेत एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. 38 वर्षापासून पहिल्यांदाच असे घडले की, एका वर्षात एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाज शतक ठोकू शकला नाही.
यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) खेळली, ती 64 धावांची होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 64 धावांची तुफानी खेळी खेळली. सध्या ऑगस्ट महिना चालू आहे. तरीही भारताला एकही एकदिवसीय सामना खेळता येणार नाही. कारण आता या वर्षी भारत फक्त कसोटी आणि टी20 सामने खेळणार आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात शेवटची वेळ 1995 मध्ये घडली होती, जेव्हा वर्षभरात एकाही भारतीय फलंदाजानं एकदिवसीय मालिकेत शतक झळकावले नव्हते. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननं 1985 मध्ये सर्वात मोठी खेळी खेळली होती. त्यानं 93 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. विशेष म्हणजे या वर्षीही कर्णधारानंच सर्वात मोठी खेळी खेळली.
2024 मध्ये भारतीय संघ केवळ 3 एकदिवसीय सामने खेळला आहे. या सामन्यात कोणताही भारतीय फलंदाज शतक झळकावू शकला नाही. भारतानं 2023चा एकदिवसीय विश्वचषक खेळल्यानंतर प्रथमच 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आणि तीही गमावली. त्यानंतर भारत आता पुढच्या वर्षी एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हाॅकी पुणे लीग: क्रीडा प्रबोधिनीचे पूर्णपणे वर्चस्व
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा कसा होणार फायदा? माजी दिग्गजाने सांगितले समीकरण
“नाव विराट कोहली, रोल नंबर 18 आणि क्लास….” कोहलीच्या चाहत्यानं केली हद्दच पार