आयपीएल 2024 चा अंतिम सामना (26 मे) रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चेपॉक मैदानावर खेळला जात आहे. या दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
कोलकाताचा तिस-या विजेतेपदावर डोळा आहे. तर हैदराबाद दुसरे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे. मात्र, 7 वर्षांनंतर आयपीएलच्या इतिहासात दोन दिग्गज खेळाडू आयपीएल फायनल खेळत नसतानाचा इतिहास घडला जात आहे.सध्या, महेंद्र सिंह धोनी किंवा हार्दिक पांड्या हे दोन भारतीय खेळाडू गेल्या 7 वर्षांपासून आयपीएल फायनल खेळत आहेत. 2017 मध्ये मुंबई इंडियन्सनं फायनल जिंकली. त्यावेळी हार्दिक पांड्या या संघाचा भाग होता.
यानंतर चेन्नईनं 2018 ला विजतेपद पटकावलं. त्यावेळी एम. एस. धोनी या संघाचा भाग होता. 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सनं पुन्हा विजेतेपद पटकावलं त्यावेळीसुद्धा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होता.2021 मध्ये धोनीच्या संघानं चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. तर 2022 मध्ये हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला. आणि संघाला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.
2023 मध्ये, चेन्नईनं पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. त्यावेळी धोनी संघाचा कर्णधार होता. यादरम्यानं एम. एस धोनी किंवा हार्दिक पांड्या गेल्या सात वर्षांत आयपीएलच्या फायनलमध्ये सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या सात वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होत आहे. की, हार्दिक किंवा धोनी आयपीएलच्या फायनलमध्ये खेळताना दिसणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलमध्ये भारतीय खेळाडूंचंच वर्चस्व! आतापर्यंत इतक्या सामन्यांत जिंकलाय सामनावीराचा पुरस्कार
आयपीएलच्या इतिहासात फक्त 3 विदेशी कर्णधारांनी पटकावलं विजेतेपद! पॅट कमिन्स रचणार का इतिहास?