आयसीसीने निवडलेल्या पंचांच्या एलीट पॅनलमध्ये एकमेवर भारतीय पंच आहेत. हे पंच म्हणजे नितीन मेनन. मेनन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या माकिलांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ऍशेस मालिकेत त्याेंनी कधीच पंच म्हणून काम पाहिले नाहीये. मात्र, यावर्षी मेनन यायंचे हे स्वप्न पूर्ण होत आहे.
नितीन मेनन (Nitin Menon ) मुळचे मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये राहणारे आहेत. वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी पंच म्हणून अनेक मोठ्या मालिकांसाठी उपस्थिती लावली आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेत यावर्षी मेनन पहिल्यांदाच उपस्थित असणार आहेत. मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात नितीन मेनन मैदानी पंच म्हणून कामकाज पाहणार आहेत. बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती मिळाली आहे. सूत्राने सांगितल्याप्रमाणे, “मेनन ऍशेसमध्ये पंचांची भूमिका पार पाडतील.”
दरम्यान, ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिका 16 जून रोजी सुरू होईल. पहिला आणि दुसरा कसोटी सामना अनुक्रमे 16 ते 20 जून आणि 28 ते 2 जुलै यादरम्यान खेळले जातील. मालिकेतील तिसार सामना 6 ते 10 जुलैदरम्यान खेळला जाणार आहे. चौथा सामना 19 ते 23 जुलै आणि पाचवा सामना 27 ते 31 जुलैदरम्यान खेळवला जाईल. मेनन मालिकेतील तिसर्या आणि चौत्या सामन्यादरम्यान मैदानी पंचाची भूमिका पार पाडणार आहेत. हे दोन्ही सामना अनुक्रमे लीड्स आणि मॅनचेस्टरमध्ये खेळले जातील. मेनन पाचव्या आणि शेवटच्या सामन्यादरम्यान टीवी अंपारयच्या भूमिकेत जबाबदारी पार पाडतील, जो लंडनमध्ये खेळला जाईल.
यापूर्वी 2020 मध्येही मेनन ऍशेस मालिकेत पंच म्हणून सामील होणार होते. पण कोरोना व्हायरलचे सावट वाढल्यामुळे नंतर या मालिकेसाठी स्थानिंक पंचांचीच नियुक्ती केली गेली. पहिल्यांदाच ऍशेसमध्ये पंच म्हणून उपस्थित राहण्यासाठी स्वतः मेनन देखील उत्सुक आहेत. याविषयी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मेनन म्हणाले की, “ऍशेस माझ्या स्वप्नातली मालिका आहे, यात शंकाच नाही. ही एकमेव मालिका आहे, जी मी टीव्हीवर पाहतो. त्याठिकाणचे वातावर आणि या पद्धतीने ही मालिका खेळली जाते, हे सर्वकाही पाहून मलाही यात सामील व्हावेसे वाटत आले आहे. मालिका इंग्लंडमध्ये असो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये मला यात भाग घ्यायचा आहे.” (For the first time in his career, Nitin Menon will be the umpire in the Ashes series )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविस्मरणीय खेळी: गांगुलीने ‘तो’ निर्णय घेतला अन् धोनीने पहिलं-वहिलं शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं
सलग सहाव्या दिवशीही अहमदनगर पेरियार पँथर्सचा झंझावात सुरूच





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा