भारतीय संघाने २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. खराब कामगिरीनंतर भारतीय संघाला सोशल मीडियावर जोरदार टीकेला सामोरे जावे लागत आहेत. याशिवाय कर्णधार विराट कोहली ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. विराटच्या कुटुंबावर काही गलिच्छ कमेंट्स केल्या जात आहेत. या सर्व प्रकारानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विराटला पाठिंबा दिला आहे.
विराट कोहलीविरोधात निर्माण झालेल्या वातावरणादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी भारतीय संघाच्या कर्णधाराच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राहुल गांधी यांनी मंगळवारी (२ नोव्हेंबर) ट्वीट केले आणि लिहिले की, ‘प्रिय विराट, हे लोक द्वेषाने भरलेले आहेत, कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना माफ कर आणि संघाला वाचव.’
Dear Virat,
These people are filled with hate because nobody gives them any love. Forgive them.
Protect the team.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2021
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या, त्यानंतर विराट कोहलीने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले होते. विराट कोहली म्हणाला होता,’ कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या धर्माच्या आधारे टीका होत असेल, तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.’ विराटने असेही म्हटले होते की, जे लोक शमीवर टीका करतात त्यांना ‘क्रिकेट’ समजलेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली सोशल मीडियावर टीकेचा बळी ठरत आहे. तसेच विराट, मोहम्मद शमीच्या समर्थनार्थ समोर आल्यानंतर अनेकांनी त्याच्याविरोधात सोशल मीडियावर अशोभनीय कमेंटही केल्या होत्या. एका वृत्तानुसार, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकावरही वाईट गोष्टी बोलल्या गेल्या होत्या.
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताचा तिसरा सामना बुधवारी ( ३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना अबुधाबी येथे होणार आहे. अफगाणिस्तान संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाने आपले दोन्ही सामने गमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकादरम्यान दिग्गज पंचांनी बायोबबलचे केले उल्लंघन, आयसीसीने केली ‘मोठी’ कारवाई
“भारतीय संघामध्ये दोन गट आहेत. एक कोहलीसोबत, तर दुसरा त्याच्या विरोधात”
‘मला आधीच माहीत होते की, ते संघर्ष करणार आहेत’, माजी दिग्गजाचे विराटसेनेवर टीकास्त्र