ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चालू असलेली बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज एका दुष्कृत्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली होती. त्यानंतरही सामन्याच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांमधून पुन्हा अशीच टीका सिराजवर करण्यात आली. अखेर स्टे़डियममधील ४-५ प्रेक्षकांना पोलिसांनी स्टेडियमबाहेर नेले. या प्रकरणाबाबत आजी-माजी क्रिकेटपटूंनी निराशा व्यक्त केली आहे.
माजी खेळाडूंच्या प्रतिक्रिया-
भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विट करत लिहिले की, “ऑस्ट्रेलियात खेळत असताना मी स्वत: प्रेक्षकांच्या तोंडून माझ्याविषयी अनेक वाईट वक्तव्ये ऐकली होती. त्यांनी माझा रंग, माझा धर्म अशा अनेक विषयांवरुन माझ्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षकांनी व्यर्थ गोष्टी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही.. तुम्ही त्यांना कसे थांबवाल??.”
I personally have heard many things on the field while playing in Australia about Me My religion My colour and much more..This isn’t the first time the crowd is doing this nonsense..How do u stop them ?? #AUSvIND
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) January 10, 2021
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही ट्विटरद्वारे आपले मत मांडले आहे. त्याने लिहिले की, “तुम्ही केला तर विनोद आणि दुसऱ्यांनी केला तर वर्णद्वेष. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील सामना पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांचे असले वर्तन खूप दुर्दैवी आहे. यामुळे चांगल्या कसोटी मालिकेची मजा खराब होत आहे.”
Tum karo toh Sarcasm , aur koi Kare toh Racism .
Very unfortunate with what some of the Australian crowd has been doing at the SCG and spoiling the vibes of a good test series. pic.twitter.com/mrDTbX4t7i— Virender Sehwag (@virendersehwag) January 10, 2021
व्हिव्हिएस लक्ष्मण या माजी भारतीय क्रिकेटपटूनेही वर्णद्वेष प्रकरणावर आपले विचार व्यक्त केले आहेत. त्याने म्हटले की, “सिडनी क्रिकेट ग्राउंडवर जे होत आहे आहे, ती खूप दुर्देवी बाब आहे. अशा मुर्खपणाला काही अर्थ नाही. मला तर समजतच नाही की, खेळाच्या मैदानावर खेळाडूंना अपशब्द बोलण्याची काय गरज असते. जर तुम्ही इथे खेळ पाहायला आला नसाल आणि खेळाडूंना सन्मान देऊ शकत नसाल, तर कृपा करून स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचे वातावरण तरी बिघडवू नका.”
Very unfortunate to see what’s happening at SCG. There is no place for this rubbish. Never understood the need to yell abuse at players on a sporting field.. If you’re not here to watch the game and can’t be respectful, then pls don’t come and spoil the atmosphere. #AUSvIND
— VVS Laxman (@VVSLaxman281) January 10, 2021
केवळ भारतीय दिग्गज नव्हे तर, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनीही प्रेक्षकांच्या दुर्व्यवहारावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहले की, “अस्विकाहार्य व्यवहार. वर्णद्वेषाला इथे जागा नाही. मला अपेक्षा आहे की, वर्णद्वेषी टीका करणाऱ्या प्रेक्षकांना कठोर शिक्षा केली जाईल.”
Unacceptable behaviour there is no place for racism, I hope this is dealt in the most severe way. #AUSvIND
— Tom Moody (@TomMoodyCricket) January 10, 2021
सक्रिय क्रिकेटपटूंचे ट्विट –
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हादेखील भारतीय खेळाडूंच्या पाठिशी उभारला आहे. त्याने ट्विट करत लिहिले आहे की, “वर्णद्वेषी टीका करणे हे खरोखरच अस्विकाहार्य आहे. आम्ही आतापर्यंत बऱ्याच वाईट वागणुकींचा सामना केला आहे. परंतु हे खूप अति झाले आहे. चालू सामन्यात असे होत असल्याचे पाहून वाईट वाटले.”
सोबतच दुसरे ट्विट करत विराटने लिहिले की, “या प्रकरणाचा लवकरात लवकर गांभार्याने तपास केला जावा. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरुन सत्य स्पष्ट होईल.”
Racial abuse is absolutely unacceptable. Having gone through many incidents of really pathetic things said on the boundary Iines, this is the absolute peak of rowdy behaviour. It's sad to see this happen on the field.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
The incident needs to be looked at with absolute urgency and seriousness and strict action against the offenders should set things straight for once.
— Virat Kohli (@imVkohli) January 10, 2021
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर झालेल्या मोहम्मद शमीनेही याविषयी आपले मत मांडले आहे. “माझ्या संघ सहकाऱ्यांवर सिडनीत परत वर्णद्वेषी टीका केली गेल्याचे पाहून वाईट वाटले. सध्याच्या जगात वर्णद्वेषाला जागा नाही आणि हे स्विकार करण्याजोगे नाही. मी अपेक्षा करतो की, आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्याने लिहिले आहे.
Disappointing to see that my teammates were subjected to racial abuse repeatedly in Sydney. There is no place for racism in today’s world and it is not acceptable. I hope that strict action is taken against those who misbehaved. #TeamIndia pic.twitter.com/pKZA9Y0gfv
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) January 10, 2021
Unacceptable behaviour by some unruly fans at SCG. True cricket lovers know, there is no place for racism anywhere. Sad to see that such unfortunate incidents bring cricket and Australia in news for wrong reasons. Hope, CA handles it professionally. #racialabuse #AUSvINDtest
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) January 10, 2021
The ones doing it and people next to them who don’t voice against it and keep quite are also equally guilty! #racialabuse #AUSvIND
— Pragyan Ojha (@pragyanojha) January 10, 2021
भारतीय संघ सिराजच्या पाठीशी –
रविवारी दुसऱ्या सत्रात सिराज बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान प्रेक्षकांमधून काही जणांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टीका केली. यानंतर सिराजने खूपवेळ वाट न पाहाता याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेला माहिती दिली. रहाणेनेही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला.
मैदानावरील पंचं पॉल रायफल यांनी या प्रकरणाबाबत लगेचच सामनाधिकारी यांना माहिती दिली. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळवले. त्यामुळे लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेथून सिराजवर टीका करण्यात येत होती तिथे जाऊन चौकशी केली आणि चार-पाच लोकांना पोलिसांनी स्टँडबाहेर नेले. या दरम्यान जवळपास १० मिनिटे खेळ थांबला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांमध्ये वर्णद्वेषी टीका करण्याबाबत काहीवर्षांपूर्वीही आरोप झाले आहेत. पण त्यानंतर मधल्या वर्षात अशा प्रकारे मर्यादा सोडून कोणतीही घटना झाली नव्हती. मात्र आता पून्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला वादाचे गालबोट लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-