भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक तत्पूर्वी जॉन बुकानन (John Buchanan) यांना वाटत आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे स्टार क्रिकेटपटू यजमान संघाच्या वेगवान गोलंदाजांचा कसा सामना करतात यावर ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारताच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता अवलंबून असणार आहे.
जाॅन बुकानन (John Buchanan) म्हणाले की, “गेल्या मालिकेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणात आता कॅमरॉन ग्रीन आणि मिचेल मार्शसह फिरकीपटू नॅथन लाॅयन यांचा करण्यात समावेश आहे. ही एक अतिशय आक्रमक गोलंदाजी लाइनअप आहे.”
पुढे बोलताना बुकानन म्हणाले की, “यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि शक्यतो श्रेयस अय्यर यांचा समावेश असलेल्या भारताच्या टॉप ऑर्डरला चांगली धावसंख्या करण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज सारखे वेगवान गोलंदाज आपली क्षमता दाखवतील. चांगला वेगवान गोलंदाजी आक्रमण असलेल्या दोन्ही संघांमधील हा सामना असेल ज्यामध्ये दोन्ही संघांचे शीर्ष फळीतील खेळाडू कशी कामगिरी करतात यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs BAN: पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच ‘या’ खेळाडूची केली सुट्टी
वयाच्या 26व्या वर्षीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू निवृत्त…! कारणही धक्कादायक
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये