मुंबई। ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. ते 59 वर्षांचें होता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सध्याच्या हंगामासाठी ते स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन टीमशी संबंधित होते आणि ते त्यासाठी मुंबईत होते. कोरोना विषाणूमुळे लीगचा सध्याचा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला जात आहे.
काही माध्यमांतील वृत्तानुसार, या दिग्गज फलंदाजाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यासोबत हॉटेलमध्ये त्यांच्या देशाचा माजी माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली देखील होता. जेव्हा जोन्सला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ब्रेट लीने सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. जोन्सला ब्रेकफास्टनंतर हॉटेल लॉबीमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल(24 सप्टेंबर) आयपीएल 2020 दरम्यान झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले होते. जोन्स हे आयपीएलमध्ये समालोचन करत होते. त्यांनी २३ सप्टेंबरला रात्री मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्याबाबत डीन जोन्सही समालोचन करीत होते.
सध्या ब्रेट ली, ब्रायन लारा, ग्रॅमी स्वान आणि स्कॉट स्टायरिस हे मुंबईमधून आयपीएलचे समालोचन करत आहेत.