---Advertisement---

पॉंटिंगने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, क्षेत्ररक्षणाची रचना पाहूनच सांगितली होती ‘ही’ गोष्ट

On: शनिवार, डिसेंबर 17, 2022 3:52 PM
Ricky Ponting
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग याला क्रिकेटबद्दल सखोल माहिती आहेे. त्याच्या नेतृत्वाखाली कांगारु संघाने सलग विश्वचषक जिंकले होते आणि पॉंटिंगने रणनिती तयार करण्यात प्रावीण्य प्राप्त केले आहे. यामुळे तो समालोचन करताना गोलंदाज आणि कर्णधार यांच्या पुढील चालींचे भाकीत आधीच करुन ठेेवतो आणि त्या गोष्टी योग्य देखील ठरतात. ऑस्ट्रेलिय़ा आणि दक्षिण आफ्रिका या संघात ब्रिस्बेन येथ कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान एक भविष्यवाणी केली आणि तसेच काहीसे घडले.

पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 152 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज वेरेने याने सर्वात जास्त 64 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने समालोचन करताना मार्को यानसन (Marco Jansen) कसा बाद होऊ शकतो याबद्दल भाकीत केले होते. पॉंटिंग समालोचन करताना म्हणाला की मिड ऑनला सीमारेषेजवळ पाठवण्यात आले आहे, त्यांना वाटत होतेे की यानसन पुढे येऊन हवेत फटका मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

रिकी पॉंटिंग याने सांगितल्या प्रमाणेच यानसेनने शॉट मारला-
पॉंटिंगने जसे आपले भाकीत वर्तवले, त्याच पद्धतीने मार्को यानसेन याने त्याच पद्धतीने शॉट खेळत बाद झाला. त्याने मिडविकेटच्या दिशेत हवेत शॉट खेळला आणि कॅमरन ग्रीन याने मागून पळत येत झेल पकडला आणि अशा पद्धतीने पॉंटिंगची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरली. माध्यमांनी ट्वीट करत म्हटले की रिकी पॉटिंगने तीच भविष्यवाणी केली जी घडणार आहे. पॉंटिंग आपल्या काळातील एक चतुर कर्णधार होता आणि या गोष्टीवरुन तुम्हाला समजते की त्याची बुद्धी किती तल्लख आहे. याचा प्रत्यय त्याने पुन्हा एकदा दिला. 2003 आणि 2007मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी संघाचा कर्णधार पॉंटिंग हा होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: विराटने सोडला सोपा कॅच, पुढे रिषभ पंतने जे केले ‘ते’ चकीत करणारे
शतक करूनसुद्धा दुसऱ्या कसोटीतून शुबमन गिल होणार बाहेर! भारताच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---