---Advertisement---

“विराट कोहली सर्वोत्कृष्ट महान वनडे क्रिकेटपटू” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

On: बुधवार, मार्च 5, 2025 6:34 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील पहिला सेमीफायनल सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघात खेळला गेला. (India vs Australia Semifinal 1) या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये थाटात एंट्री केली. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 84 धावा केल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. यानंतर आता माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू मायकेल क्लार्कने कोहलीचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी नॉकआउटमधील लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोहली मैदानावर आला आणि त्याने शानदार स्ट्रोक प्ले आणि बुद्धिमान स्ट्राइक रोटेशनने विजयाचे अंतर कमी केले. दरम्यान त्याने केवळ 5 लगावले. जे कठीण परिस्थितीत धावा करण्याची त्याची क्षमता दर्शवते. मायकेल क्लार्कने जिओ हॉटस्टारशी बोलताना सांगितले की, “पुन्हा एकदा, त्याने परिस्थितीचे उत्तम मूल्यांकन केले. तो एक हुशार खेळाडू आहे, त्याला माहित होते की त्याच्या संघाला काय हवे आहे आणि त्यांना सामने जिंकण्याच्या स्थितीत कसे आणायचे.”

ऑस्ट्रेलियन दिग्गज पुढे म्हणाला, “पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या शतकातही आपण हेच पाहिले. विराटकडे प्रत्येक शॉट आहे. त्याच्या चौकार मारण्याच्या क्षमतेबद्दल प्रश्नच नाही. माझ्या मते तो सर्वकालीन महान वनडे क्रिकेटपटू आहे आणि तो सर्वात मोठ्या टप्प्यांवर, सर्वात जास्त दबाव असतानाही ते सिद्ध करत राहतो. त्याला काय करायचे हे माहित आहे आणि जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा तो चांगली कामगिरी करतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

NZ vs SA: सेमीफायनलमध्ये केन विल्यमसनचा जलवा! झळकावले शानदार शतक
दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास, रिझर्व्ह डे असणार का नाही?
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---