क्रिकेटविश्वात एकापेक्षा एक क्रिकेटपटू आहेत. विस्फोटक फलंदाजीमुळे त्यांची गणना जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम यांचाही समावेश आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या एका माजी फलंदाजाला असे वाटत नाही. त्याने इंग्लंड क्रिकेट संघातील एका खेळाडूला विराट आणि बाबरपेक्षा वरचढ म्हटले आहे. कोण आहे तो खेळाडू चला जाणून घेऊया…
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने दमदार प्रदर्शन करत मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्याने इंग्लंडने मालिका जिंकली. अशात इंग्लंड क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज मायकल हसी (Michael Hussey) याने इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याचे कौतुक केले.
Dawid Malan received his 50th IT20 cap yesterday! 👏
🇦🇺 #AUSvENG 🏴 | @dmalan29 pic.twitter.com/86WoisGI49
— England Cricket (@englandcricket) October 13, 2022
हसीने डेविड मलान याला विराट कोहली (Virat Kohli) आणि बाबर आझम (Babar Azam) यांच्यापेक्षा सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. तसेच, त्याने मलानला त्याच्या 50व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यासाठी खास कॅपही दिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात मलानला खास क्षणी 50व्या आंतरराष्ट्रीय सामन्याची कॅप देणाऱ्या हसीने मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, “हे असे काही तरी आहे, ज्याचा मी कधीही विचार केला नसेल की, मी माझ्या आयुष्यात इंग्लंडच्या या खेळाडूला ही खास कॅप देईल. इंग्लंडसाठी आपला 50वा सामना खेळणाऱ्या डेविड मलान याला शुभेच्छा. तू तुझ्या कारकीर्दीत आधीच खूप काही मिळवलं आहेस, ज्यामध्ये इंग्लंडसाठी 4 शतकांपैकी एक, जगातील अव्वल दर्जाचा खेळाडू आणि सर्वात वेगवान 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यापेक्षा सर्वोत्तम. माझा असा विश्वास आहे की, काही डावांमध्ये का असेना, पण त्याने वेगवान धावा केल्या आहेत. मी प्रार्थना करतो की, आगामी सामन्यांमध्ये तू चांगली कामगिरी करशील. तसेच, आगामी विश्वचकषकाचे विजयी मेडल परिधान करताना दिसशील.”
ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या टी20 विश्वचषक 2022ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून पहिल्या राऊंडने होणार आहे. यानंतर 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 फेरीचे सामने खेळले जातील. इंग्लंडचा पहिला सामना 22 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शॉकिंग! शमीच्या एक्स पत्नीसोबत चालत्या रेल्वेमध्ये घडली मोठी घटना, तिकीट तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने…
महिला आशिया चषकात स्म्रीतीचा जलवा! फिफ्टी ठोकत नावावर केला जबरा विक्रम