भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) असून उभय संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका (ODI Series) होणार आहे. १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. त्यातही दक्षिण आफ्रिकेत पाहुणा म्हणून गेलेल्या भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलला भारताच्या वनडे संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची (Jasprit Bumrah Vice-Captain) जबाबदारी आहे. त्याच्यावर ही जबाबदारी देण्यामागचे कारण (MSK Prasad On Jasprit Bumrah) माजी संघ निवडकर्ते एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी सांगितले आहे.
बुमराहला उपकर्णधार बनवण्यामागचा निर्णय योग्य
न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना प्रसाद यांनी बुमराहला उपकर्णधार बनवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बुमराह खूप समजदार व्यक्ती आहे. म्हणून त्याला याची भेटही मिळायला पाहिजे होती. मला हा निर्णय चांगला वाटला. जर एखादा वेगवान गोलंदाज क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात चांगले प्रदर्शन करत असेल, तर त्याला नक्कीच उपकर्णधार बनवले गेले पाहिजे. जेव्हापर्यंत तुम्ही त्याला नेतृत्त्वगटात संधी देत नाही, तेव्हापर्यंत तुम्हाला कसे कळेल की, बुमराहमध्ये किती क्षमता आहे.
ही निवड फक्त एका मालिकेपुरती मर्यादित असल्याने हा निर्णय घेणे खूप सोपे राहिले असेल. जर रोहित आणि राहुल दोघेही अनुपलब्ध असते, तर कर्णधारपदाबाबतचा निर्णय घेणे खूपच अवघड बनले असते, असेही त्यांनी म्हटले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दिपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत वनडे मालिकेचे वेळापत्रक-
१९ जानेवारी, पहिला वनडे सामना (पर्ल)
२१ जानेवारी, दुसरा वनडे (पर्ल)
२३ जानेवारी, तिसरा वनडे (केपटाऊन)
महत्त्वाच्या बातम्या-
जोहान्सबर्ग कसोटीत पाऊस घालणार विघ्न, जाणून घ्या ५ दिवस कसे असेल हवामान?
‘विजयी’ टीम इंडियात बदलाची फारच कमी शक्यता! जोहान्सबर्ग कसोटीत अशी असेल प्लेइंग इलेव्हन
हेही पाहा-