---Advertisement---

एस श्रीसंतने निवडला सर्वकालिन वनडे संघ, धोनी नव्हे तर ‘या’ खेळाडूला बनवले कर्णधार

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 3:27 PM
S Sreesanth
---Advertisement---

आजकाल क्रिकेटमध्ये एक नवीन ट्रेंड निघाला आहे. तो म्हणजे माजी क्रिकेटपटू ज्यांनी क्रिकेटमध्ये कामगिरी करून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचा संघ निवडणे. अगदी सध्याचे क्रिकेटपटू देखील त्यांच्या सर्वकालीन महान ११ खेळाडूंचा संघ निवड करत असतात. नुकतेच स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला माजी गोलंदाज एस श्रीसंतने देखील त्याच्या वनडेतील सर्वकालीन ११ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.

श्रीसंतने ‘या’ फलंदाजांवर दाखवला विश्वास 
एस श्रीसंतने आपल्या सर्वकालीन वनडे संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांना सलामीची जबाबदारी दिली आहे. या दोन्ही फलंदाजांची वनडे आकडेवारी खूपच चांगली असल्याने त्याने त्यांची निवड केली आहे. तर त्याने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची निवड केली आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज ब्रायन लारा यांची निवड केली आहे. तर चौथ्या क्रमांकावर त्याने भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीला स्थान दिले आहे. पाचव्या क्रमांकासाठी श्रीसंतने दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सची निवड केली. तर सहाव्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी आक्रमक फलंदाज युवराज सिंहची निवड केली आहे. सातव्या क्रमांकाची आणि संघाचे यष्टिरक्षणाची जबाबदारी त्याने महेंद्रसिंग धोनीवर दिली आहे.

या गोलंदाजांना दिली जागा 
तर श्रीसंतने दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडले आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी विभागात दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांना निवडले आहे. तर संघात एकमेव फिरकीपटू म्हणून श्रीसंतने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नची निवड केली आहे.

माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतने निवडलेले वनडेतील सर्वकालीन ११ खेळाडू खूप मजबूत दिसून येत आहे. निश्चितच या संघात जगातील कोणत्याही संघाला हरवण्याची क्षमता आहे. मात्र, त्याने अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवागला आपल्या संघात निवडलेले नाही.

श्रीसंतचा सर्वकालीन वनडे संघ 
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली (कर्णधार), ब्रायन लारा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युवराज सिंग, एमएस धोनी (यष्टिरक्षक), जॅक कॅलिस, शेन वॉर्न, एलन डोनाल्ड, ग्लेन मॅकग्रा

महत्त्वाच्या बातम्या-

‘गोल्डन डक’ ची जखम अजूनही ताजी, आता कोहली घेणार भारताच्या विजयाची जबाबदारी! दिले संकेत

सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम

भर सामन्यात सिराजचा सॅमीशी ‘पंगा’, जवळ जाऊन खूप ऐकवलं; अखेर कोहलीने केलं शांत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---