---Advertisement---

‘गोल्डन डक’ ची जखम अजूनही ताजी, आता कोहली घेणार भारताच्या विजयाची जबाबदारी! दिले संकेत

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 3:10 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर १ बाद ५२ धावा केल्या आहेत. अशात अखेरच्या दिवशी हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली प्रचंड मेहनत घेताना दिसून येत आहे.

भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर फलंदाजांना, मुख्यतः विराट कोहलीला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. विराटलाही ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. त्यामुळे विराट कोहली कसून सराव देखील करत आहे. शनिवारी (७ ऑगस्ट) चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहली मैदानावर सराव करताना दिसून आला आहे.(Virat Kohli practising hard after 4th day of first test match)

विराट कोहली पहिल्या डावात जेम्स अँडरसनच्या चेंडूवर गोल्डन डक झाला होता. त्यामुळे दुसऱ्या डावात तो चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी आला होता. परंतु जेम्स अँडरसनने अप्रतिम आऊट स्विंग होणारा चेंडू टाकला होता. तो चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक जोस बटलरच्या हातात गेला होता. यामुळे कोहलीला शून्यावर माघारी जावे लागले होते.

त्यामुळे चौथ्या दिवसाच्या (७ ऑगस्ट) समाप्तीनंतर संपूर्ण भारतीय संघ एका बाजूला सराव करत होता. तर विराट कोहली एका बाजूला सराव करत होता.

https://twitter.com/fwildecricket/status/1424070113670664196?s=20

https://twitter.com/idineshshine/status/1424204213148598272?s=20

 

भारतीय संघासमोर विजयासाठी २०९ धावांचे आव्हान
भारतीय संघाला इंग्लंड संघाने विजयासाठी २०९ धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर (७ ऑगस्ट) भारतीय संघाच्या धावा १ गडी बाद ५२ होत्या. यामध्ये केएल राहुल २६ धावा करत माघारी परतला आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी १२-१२ धावा करून मैदानावर टिकून आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांचेच लक्ष भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर टिकून असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भर सामन्यात सिराजचा सॅमीशी ‘पंगा’, जवळ जाऊन खूप ऐकवलं; अखेर कोहलीने केलं शांत

बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली

सचिनमुळे क्रिकेट खेळायला केली होती सुरुवात, पुढे झाला देशाचा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---