मुंबई । भारताला दोनदा विश्वचषक जिंकून देणारा एमएस धोनीने काही दिवसांपुर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आईच्या वाढदिवशी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.29 वाजता धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सर्वांना चकित केले.
गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या भविष्याबाबत सतत चर्चा सुरू होती आणि विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याबाबतची चर्चा आणखी तीव्र झाली. माजी भारतीय कर्णधाराने जवळपास दोन वर्षापूर्वी निवृत्तीची योजना आखत होता. मात्र ब्रॅण्डच्या जाहिरातींमुळे त्याला अंतिम निर्णय घेता आला नाही.
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, जानेवारीमध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याचे ठरवले होते, जेव्हा बीसीसीआयने 2019-2020 वर्षांकरिता पुरुष क्रिकेट खेळाडूंसाठी करार जाहीर केला होता. धोनीला त्या करारातून काढून टाकले होते. यानंतर रांची येथे धोनीने आपल्या मित्रांना विचारले की, त्यांनी मला यादीतून का वगळले? मी तंदुरुस्त नाही का? विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने त्याच्याशिवाय जिंकण्याचे नवे मार्ग शोधले आहेत हे त्यालादेखील माहित होते.
बीसीसीआयने दिलेला धक्का धोनीला सहन झाला नाही
माजी भारतीय कर्णधार 16 जानेवारी 2020 रोजी जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयने दिलेला धक्का सहन करू शकला नाही. त्याने त्याची पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितले की त्याने या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे आणि असे वाटते की दोन वर्षांपूर्वी आपण निवृत्त झाले पाहिजे होते.
टी -20 संघात परत येण्याची होती आशा
धोनीला अजूनही टी -20 संघात परतण्याची आशा होती आणि त्याने जोरदार सराव सुरू केला. टेनिसही खेळत होता. मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसोबत फिट राहण्यासाठी माइंड गेम्समध्ये खेळत होता. पण बीसीसीआयने त्याला पुन्हा करारबद्ध केले नाही किंवा धोनी टी -20 संघात येऊ शकेल असे संकेतही दिले नाही.
क्रिकेटनंतर धोनीचे भविष्य
धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यापासून आता त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. धोनीचे राजकारणातील मित्र आणि झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री सुदेश महतो यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्हींपैकी एक धोनीसाठी असेल. एक म्हणजे दुबईमध्ये आयपीएलमधील कामगिरीनंतर बीसीसीआय त्याला परत बोलवू शकेल किंवा त्याला सरकारमध्ये एक महत्त्वाची भूमिका मिळेल.