---Advertisement---

भारताच्या माजी कर्णधारानं अचानक निवृत्ती जाहीर केली, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम!

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024 6:33 PM
---Advertisement---

भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिनं निवृत्ती जाहीर केली आहे. तिनं 16 वर्षे भारतीय हॉकीची सेवा केली. तिचं नाव महिला हॉकीच्या महान खेळाडूंमध्ये गणल्या जातं. राणीनं भारतासाठी एकूण 254 सामने खेळले, ज्यामध्ये तिनं 120 गोल केले. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघानं 2020 टोकियो ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली होती.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार राणी रामपाल तिच्या निवृत्तीवर म्हणाली, “हा एक अद्भुत प्रवास होता. मी भारतासाठी इतके दिवस खेळू शकेन, असं मला कधीच वाटलं नव्हते. मी लहानपणापासूनच खूप गरीबी पाहिली आहे. पण मी नेहमी लक्ष केंद्रित केलं होतं. मला काहीतरी मोठं करत असताना नेहमीच देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं.”

राणी रामपाल केवळ 29 वर्षांची आहे. तिनं 2008 मध्ये वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी भारतासाठी पदार्पण केलं होतं. ती हरियाणातील शाहबाद मार्कंडा भागातील असून तिचे वडील सामानानं भरलेल्या गाड्या ओढण्याचं काम करायचं. गरिबीतून भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार होण्यापर्यंतचा तिचा प्रवास प्रेरणादायी आहे. राणी 2023 च्या सुरुवातीला शेवटची भारतासाठी खेळली होती. वास्तविक, त्यावेळी प्रशिक्षक असलेल्या जननेके शॉपमन यांनी राणीला कोणतंही कारण न देता संघातून वगळलं होतं.

भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर राणीनं कोचिंगवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. ती गेल्या वर्षी सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय संघाची प्रशिक्षक होती. ती सध्या हॉकी इंडिया लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. येथे ती सुरमा हॉकी क्लबच्या कोचिंग स्टाफची सदस्य आहे.

हेही वाचा – 

वॉशिंग्टन सुंदरनं सात विकेट घेत मिळवलं दिग्गजांच्या क्लबमध्ये स्थान, 7 वर्षांनंतर असं प्रथमच घडलं!
पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व, आता मदार फलंदाजांवर!
गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक! पुणे कसोटीत वॉशिंग्टनची अति ‘सुंदर’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---