---Advertisement---

‘मी उत्तरच द्यायला नव्हतं पाहिजे’, शेन वॉर्नवरील ‘त्या’ प्रश्नाबद्दल असे का म्हणाले गावसकर?

On: मंगळवार, मार्च 8, 2022 1:33 AM
Shane-Warne-And-Sunil-Gavaskar
---Advertisement---

शुक्रवारी (०४ मार्च) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील ‘फिरकीचा जादूगार’ म्हणजेच शेन वॉर्नने या जगाचा निरोप घेतला होता. वॉर्नच्या निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता. एकीकडे वॉर्नच्या निधनावर सगळे दु:ख व्यक्त करत असताना, माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी वॉर्नला क्रिकेट इतिहासातील महान फिरकीपटू नसल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी वॉर्नच्या भारताविरुद्धच्या आकडेवारीची माहिती दिली होती. मात्र, आता त्यांनी या वक्तव्यावर आपले मत स्पष्ट केले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विचारल्यानंतर गावसकरांनी (Sunil Gavaskar) सांगितले होते की, ते वॉर्नला (Shane Warne) क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटू मानत नाहीत. यावर कसोटीत सर्वात पहिल्यांदा १० हजार धावा ठोकणाऱ्या गावसकरांनी सांगितले होते की, “माझ्यासाठी भारतीय फिरकीपटू आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हा वॉर्नपेक्षा चांगला आहे. शेन वॉर्नचा भारताविरुद्धचा विक्रम तुम्ही पाहा. ती एक सामान्य आकडेवारी आहे.” त्यांनी सांगितले की, “वॉर्नला नागपूरच्या कसोटीत एकदाच पाच विकेट मिळाल्या होत्या. त्याशिवाय त्याला भारताविरुद्ध कोणतेही मोठे यश मिळाले नाही. मुरलीधरनला भारताविरुद्ध खूप यश मिळाले आहे, त्यामुळे मी त्याला अधिक चांगला फिरकीपटू मानतो.”

गावसकरांचे स्पष्टीकरण
या वक्तव्यानंतर गावसकरांवर खूप टीका करण्यात आली होती. आता गावसकरांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, “मागचा आठवडा क्रिकेटसाठी अत्यंत धक्कादायक होता. आपण रॉड मार्श आणि शेन वॉर्न या खेळातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेटपटूंना गमावले. मला एका अँकरने विचारले की, वॉर्न हा आतापर्यंतचा महान स्पिनर आहे का? आणि मी माझे प्रामाणिक वैयक्तिक मत दिले.”

गावसकर पुढे म्हणाले की, “त्यांना ते विचारले नव्हते पाहिजे. तसेच, मी उत्तरही दिले नव्हते पाहिजे. कारण, ही कोणत्याही तुलना किंवा मूल्यांकनाची वेळ नव्हती. वॉर्न हा या खेळाची शोभा वाढवणारा महान क्रिकेटपटू होता. रॉड मार्श हे या खेळातील महान यष्टीरक्षकांपैकी एक होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

शेन वॉर्नच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १४५ कसोटी सामन्यातील २७३ डावात २.६५ च्या इकॉनॉमी रेटने ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये ७१ धावा देत ८ विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितच्या नेतृत्वातील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताचा धमाकेदार विजय; गावसकरांनी डायरेक्ट दिले ‘इतके’ मार्क

‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा

महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---