क्रिकेट विश्वात कोणत्याही संघाच्या विजयासाठी फक्त खेळाडूंना श्रेय दिले जाते. पण खूप कमीवेळा संघाची निवड समिती किंवा सपोर्ट स्टाफला श्रेय दिले जाते. कोणत्याही देशात निवड समितीचा संघ उभारण्यात एक महत्वाचा वाटा असतो. भारतीय क्रिकेटमधील निवडकर्त्यांचे कार्य असे आहे की, त्यांना संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय क्वचितच मिळते. उलट खेळाडूंची निवड किंवा खेळाडूंना वगळण्याप्रकरणी त्यांना टीकांना सामोरे जावे लागते.
माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांना त्यांच्या कार्यकाळात वारंवार या गोष्टींचा सामना करावा लागला. याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी २०१९ च्या विश्वचषकमधील अनुष्का शर्मा संबंधित एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांना माजी क्रिकेटपटू व चाहत्यांच्या टीकेच्या सामोरे जावे लागले होते.
एमएसके प्रसाद यांनी भारतीय क्रिकेटमध्ये अनेकदा कठोर निर्णय घेतले आहेत. एमएसके प्रसाद हे २०१६ ते ते २०२० पर्यंत वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७, एकदिवसीय विश्वचषक २०१८ आणि २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी खेळाडू निवडण्यात त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले. याबद्दल बर्याच वेळा वादही उद्भवले होते. परंतु केवळ निवडीबद्दलच त्यांच्यावर टीका झाली नव्हती, तर 2019 एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मावरूनही भारतीय निवडसमितीवर चाहत्यांनी निशाणा धरला होता.
ज्यावेळी एमएसके प्रसाद निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळेस भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजीनियर बोलले होते की, “आमच्याकडे मिकी माऊस निवड समिती आहे. या समितीमधील माजी खेळाडूंना १२ कसोटी सामनेही खेळण्याचा अनुभव नाही. भारतीय निवडकर्ते हे कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीला कॉफी सर्व्ह करण्याचेही कामे केली आहेत.”
संघ व्यवस्थापनला माहिती आहे आम्ही काय काम केले
या घटनेवर बोलताना एमएसके प्रसाद यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला असे सांगितले की, “त्या कॉफी सर्व्ह करण्याच्या घटनेत निवडकर्त्यांना बळजबरी मध्ये ओढले होते. त्यावेळी खूप हंगामा झाला होता. पण जेव्हा भारतीय संघाने स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी सामन्यात त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले. तेव्हा कोणीच भारतीय निवड समितीच्या निवडकर्त्यांचे कौतुक केले नाही. आम्हाला या गोष्टीचा फरक नाही पडत कारण संघ व्यवस्थापनाला माहिती आहे की, आम्ही किती मेहनत घेतली आहे व त्यांनी त्यासाठी आमचे कौतुकही केले. आमच्यासाठी हे समाधानकारक आहे. बाहेर कोणी किती बोलावे. पण संघासोबत असणाऱ्यांना माहित आहे की आम्ही किती काम केले आहे. खासकरून भारतीय संघाचे गोलंदाजीची प्रशिक्षक भरत अरुण आणि पारस म्हाम्ब्रे यांना माहित आहे.”
घरगुती क्रिकेटमध्ये नवीन प्रतिभाशाली खेळाडू तयार करण्याचे काम केले
ते पुढे म्हणाले की, “आम्ही तरुण खेळाडू तयार करण्यासाठी संपूर्ण नवीन रचना तयार केली. पूर्वी गोलंदाज आपल्या डोक्याने व आपल्या चुकांमधून शिकायचे. पण आता सर्व काही निश्चित झाले आहे. एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, ज्यात गोलंदाजांना सांगितले जाते की त्यांना कोणती लाईन आणि लेन्थ फलंदाजांना द्यावी लागेल. त्याच्या गोलंदाजीचे कमकुवत पैलू काय आहे? सर्वात मोठे फलंदाज कसे बाहेर पडायचे. हे त्यांना माहित आहे आणि त्यासाठी तंदुरुस्त राहणेही महत्त्वाचे आहे.”
प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही सुरुवातीपासूनच युवा गोलंदाजांच्या फिटनेसवर काम करत होतो. त्याचे निकाल आता दिसून येत आहेत. पूर्वीचे गोलंदाज दोन कसोटी सामन्यानंतरच जखमी व्हायचे. पण आता असं होत नाही. यामध्ये मंडळाची, निवड समितीची तसेच प्रशिक्षणाशी संबंधित असलेल्या लोकांची भूमिका महत्त्वाची आहे.”
महत्वाच्या बातम्या
ओळखा पाहू! आज क्रिकेटविश्वाला वेड लावणारे स्टार भारतीय क्रिकेटपटू, बालपणी दिसत होते ‘असे’
राशिदचा आबुधाबीत जलवा; सामन्यात ५ विकेट्स घेत सलग दुसऱ्यांदा जिंकला सामनावीर पुरस्कार